Authored by रेणुका देशमुख | Maharashtra Times | Updated: 11 Jan 2023, 1:06 pm
Vivo Y01, Vivo Y16, vivo Y02, Nokia C 30, Nokia C21 Plus स्मार्टफोन खूप कमी म्हणजे अगदी १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत घेतले जाऊ शकतात. जाणून घ्या फोन्सच्या फीचर्सबद्दल.

Nokia C01 Plus

Nokia C01 Plus: हँडसेटमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज वाढवता येते. स्मार्टफोनमध्ये ५.४५ -इंचाचा डिस्प्ले आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सेल रियर आणि २ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. या हँडसेटमध्ये ३००० mAh बॅटरी आहे. फोन Unisoc SC9863A प्रोसेसरसह येतो. Nokia C01 Plus सध्या फ्लिपकार्टवर ५४९९ रुपयांना उपलब्ध आहे
Nokia C21 Plus : नोकिया सी21 प्लस स्मार्टफोन फ्लिपकार्टवर १०,२९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. या फोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. Nokia C21 Plus फोनमध्ये ६.५७ इंच HD+ डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये 13 मेगापिक्सेल आणि २ मेगापिक्सेल रिअर कॅमेरासह ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
वाचा :लिस्ट ठेवा तयार ! येतोय Amazon Great Republic Day Sale, मिळणार भन्नाट डील्स
Nokia C30

Nokia C30 : Nokia C30 स्मार्टफोन Flipkart वरून ९४४९ मध्ये खरेदी करता येईल. नोकियाच्या या फोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. Nokia C 30 मध्ये ६.५८ इंच HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटमध्ये ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. नोकियाच्या या फोनला पॉवर देण्यासाठी ६००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये Spreadtrum SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे.
वाचा : OMG! सहज कॉपी होऊ शकतो तुमचा आवाज, लागतात फक्त ३ सेकंद, पाहा डिटेल्स
Vivo Y01A

Vivo Y01A : Vivo Y01A स्मार्टफोन Flipkart वरून ७८५० रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डद्वारे फोन ५ टक्के स्वस्त दराने मिळू शकतो. हँडसेटमध्ये 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५१ इंच HD+ डिस्प्ले आहे. Vivo च्या या एंट्री-लेव्हल स्मार्टफोनमध्ये ८-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. फोनमध्ये ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेटला पॉवर करण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. Vivo Y01 मध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर देण्यात आला आहे.
वाचा: फोनमध्ये अचानक हे बदल दिसताहेत ? व्हा अलर्ट, असू शकतो Hacking चा प्रकार
Vivo Y02

Vivo Y02: Vivo Y02 स्मार्टफोन ८९९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. Y02 मध्ये ८ मेगापिक्सेल रियर आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसला पॉवर करण्यासाठी Vivo ने ५००० mAh बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन MediaTek P22 प्रोसेसरसह येतो.
Vivo Y16: Vivo Y16 स्मार्टफोन Flipkart वर १०४९९ रुपयांमध्ये लिस्ट झाला आहे. हँडसेटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. Vivo Y16 स्मार्टफोनमध्ये ६.५१ इंच HD+ डिस्प्ले आहे. हँडसेटमध्ये १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. फोनला पॉवर करण्यासाठी ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Vivo Y15s

Vivo Y15s : Vivo Y15S स्मार्टफोन १०,४९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये ६.५१ इंच HD+ डिस्प्ले आहे. Y15S मध्ये १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हँडसेटमध्ये ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. डिव्हाइसला पॉवर करण्यासाठी Vivo ने ५००० mAh बॅटरी दिली आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर उपलब्ध आहे.
वाचा: मोठ्या स्क्रीनचा Smart TV १५ हजारात खरेदी करण्याची संधी, डिव्हाइसची MRP ५० हजारांपेक्षा जास्त
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times