iQOO 11 5G Launched : इतरांप्रमाणे आपल्याकडेही चांगले कॅमेरा फिचर्स, बॅटरी, रॅम आणि भरपूर स्टोरेज असणारा एक प्रीमिअम स्मार्टफोन असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. नवीन वर्षानिमित्त तुम्हीही अशा स्मार्टपोनच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण आज iQOO ने आपला नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च केला आहे. कंपनीने iQOO 11 5G ला दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च केलं आहे. iQOO 11 5G ची विक्री 12 जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनवर उपलब्ध होणार आहे. 

 

iQOO 11 5G स्पेसिफिकेशन

या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना 6.7-इंचाचा Samsung E6 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 2 चिपसेट देण्यात आला आहे. मोबाईल फोन 8/256 आणि 16/256 GB या दोन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने हा स्मार्टफोन Android 13 वर सादर केला आहे आणि सांगितले आहे की याला 4 वर्षांसाठी 3 Android अपडेट आणि सुरक्षा अपडेट मिळत राहतील. 

कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा Samsung GN5 प्रायमरी कॅमेरा, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल कॅमेरा आणि 13-मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा असेल. त्याच वेळी, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16-मेगापिक्सलचा कॅमेरा फ्रंटला देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कंपनीने दावा केला आहे की स्मार्टफोन फक्त 8 मिनिटात 50% चार्ज होतो.

किंमत किती? 

IQ ने हा स्मार्टफोन दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लॉन्च केला आहे. पहिला 8/256gb आणि दुसरा 16/256gb आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये आहे, तर 16 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे. या स्मार्टफोनवर लोकांना अनेक ऑफर्सही दिल्या जात आहेत. 

news reels

IQ 11 5G च्या टॉप मॉडेलवर तुम्ही 10,000 रुपये वाचवू शकता. तुम्ही ते एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 5,000 रुपयांची सूट मिळू शकते. त्याच वेळी, ग्राहकांना एक्सचेंज बोनसच्या रूपात 4,000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. वेगवेगळ्या डिस्काउंटनंतर तुम्ही हा स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या डिस्काउंटवर खरेदी करू शकता.  

‘हे’ स्मार्टफोन लवकरच लॉन्च केले जातील

IQ व्यतिरिक्त, Realme GT Neo 5 आणि Moto X40 स्मार्टफोन देखील या महिन्यात बाजारात लॉन्च केले जातील. Realme GT neo 5 बद्दल असा दावा केला जात आहे की ग्राहकांना यामध्ये 2 बॅटरी पर्याय मिळतील. Moto X40 मध्ये, ग्राहकांना 4600 mAh बॅटरी मिळू शकते जी 125 W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करू शकते.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here