नवी दिल्लीः चायनीज स्मार्टफोन्स ब्रँड्सला मोठा झटका बसला आहे. एप्रिल – जूनच्या तिमाहीत कंपनीची मार्केटमधील भागीदारी घसरली आहे. जानेवारी-मार्च मध्ये ही ८१ टक्के भागीदारी होती आता ती ७२ टक्क्यांवर घसरली आहे. काउंटर पॉइंट रिसर्च ने यासाठी शाओमी, ओप्पो, विवो आणि रियलमी यासारख्या ब्रँड्सचा कमी झालेला पुरवठा आणि युजर्सचा वाढता चायना विरोध हे त्यामागे कारण असल्याचे सांगितले आहे.

वाचाः

करोना व्हायरस
काउंटर पॉइंट रिसर्चच्या माहितीनुसार, भारतात स्मार्टफोन शिपमेंट्स २०२० च्या एप्रिल जून कॉर्टर मध्ये ईयर ऑन ईय़र ५१ टक्के कमी आली आहे. यामागे सर्वात मोठे कारण ठरले, एप्रिलमधील कोविड १९ हे कारण. कोविडमुळे एप्रिल महिन्यात लॉकडाऊन होते. त्यादरम्यान कंपन्यांची शिपमेंट्स शून्य झाली होती.

वाचाः

५० कोटी झाला स्मार्टफोन युजरबेस
रिपोर्टमध्ये हेही सांगितले आहे की, पहिल्यांदा भारतात स्मार्टफोनचा बेस ५० कोटींहून जास्त पोहोचला आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या रिसर्च अॅनालिस्ट शिल्पी जैन यांनी सांगितले की, चायनीज ब्रँडच्या लोकल मॅन्यूफ्रक्चरिंग, R&D ऑपरेशन्स, आकर्षक ऑफर्समुळे युजर्संकडे निवडण्यासाठी खूप कमी ऑप्शन राहतात. ग्लोबलायझेशनमध्ये कोणत्याही प्रोडक्टला देशाच्या नावावर लेबल करणे चुकीचेच आहे. कारण, प्रोडक्टला तयार करण्यासाठी लागणारे कंपोनेंट्स वेगवेगळ्या देशातून इंपोर्ट करावे लागतात, असे जैन यांनी सांगितले.

वाचाः

नॉन चायनीज ब्रँडला मिळाली संधी
मार्केटमध्ये सध्या या बदलामुळे सॅमसंग आणि दुसरे भारतीय ब्रँड मायक्रोमॅक्स आणि लावाला भारतीय बाजारात आपली भागीदारी वाढवण्याची चांगली संधी मिळाली आहे. जिओ आणि गुगलची पार्टनरशीप मुळे लवकरच बाजारात स्वस्तातील अँड्रॉयड ४ जी स्मार्टफोनची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे चायनीज ब्रँड्सचे संकट आता थोड गडद होताना दिसत आहे.

वाचाः

मार्केट वेग पकडतोय
एजन्सीच्या माहितीनुसार, मार्केट आता हळू हळू सामान्य होत आहे. जूनमध्ये इयर ऑन इयर मध्ये ०.३ टक्के कमी पाहायला मिळाली आहे.

वाचाः

सॅमसंगची कमाल, विवोची घसरण
२०२० च्या दुसऱ्या तिमाहीत शाओमीची २९ टक्के भागीदारीसोबत मार्केटमध्ये लीड होती. तर सॅमसंगने विवोला मागे टाकून २६ टक्के भागीदारी मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. गेल्या दोन वर्षात हा सॅमसंगचे सर्वात जास्त मार्केट शेयर आहे. विवोचे मार्केट शेयर १७ टक्के राहिले. तर रियलमी आणि ओप्पो अनुक्रम ११ आणि ९ टक्के भागीदारी राहिली.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here