नवी दिल्लीः भारती आणि वोडाफोन – आयडियाला युजर्स संख्येत एप्रिल महिन्यात जबरदस्त फटका बसला आहे. एअरटेलने जवळपास ५२.६ लाख युजर्स गमावले आहेत. तर वोडाफोन – आयडियाचे ४५.१ लाख युजर्स कमी झाले आहेत. याप्रमाणे दोन्ही कंपन्यांचे जवळपास १ कोटी युजर्स कमी झाले आहेत. तर दुसरीकडे रिलायन्स जिओला जबरदस्त फायदा झाला असून त्यांचे युजर्स वाढले आहेत.

वाचाः

मार्केट लीडर रिलायन्स जिओने या दरम्यान मार्केटची परिस्थिती ठीक नसताना सुद्धा १५.७ लाखांहून जास्त नवीन युजर्स जोडले आहेत. मार्च २०२० मध्ये जिओला जवळपास ४७ लाख नवीन युजर्स मिळत होते. त्यामुळे हा आकडा कमी आहे. परंतु, बाकी कंपन्यांच्या तुलनेत जिओची कामगिरी चांगली आहे. बाकी कंपन्यांप्रमाणे जिओचा युजरबेसला नुकसान पोहोचले नाही.

वाचाः

वेगाने वाढत आहेत टेलिकॉम युजर्स
नवीन युजर्स संबंधी आकडे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) कडून शेयर करण्यात आले आहेत. एप्रिल २०२० मध्ये सुरू असताना खूप साऱ्या युजर्संनी आपले मोबाइल कनेक्शन बंद करावे लागले होते. या युजर्समध्ये प्रवासी मजूर आणि उर्वरित युजर्सचा समावेश होवू शकतो. टेलिकॉम रेग्यूलेटरी कडून म्हटले की, एप्रिलमध्ये नवीन भारतीय टेलिकॉम युजर्स ८० लाख हून अधिक नवीन युजर्स जोडले जात आहे.

वाचाः

महाग होवू शकतात टॅरिफ प्लान
एअरटेल आणि वोडाफोन – आयडिया लिमिटेडचे युजर्स ३२.२ कोटी कमी होवून ३१.४ कोटी राहिले आहेत. जिओचा युजरबेस एप्रिलमध्ये ग्रोथ झाल्यानंतर ३८.९ कोटी झाला आहे. मार्केटची सध्याची परिस्थिती पाहता टॅरिफ प्लान महाग होवू शकतात. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सर्व कंपन्यांचे प्लान महाग झाले होते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here