LeEco S1 Pro phone in China : अॅपल आयफोनची (iPhone) जगभरात जोरदार चर्चा असते. विशेषत: तरूणाईत अॅपलची मोठी क्रेझ पाहायला मिळते. अॅपल आयफोनची महागडी किंमत आणि दमदार फिचर्सबद्दल तरूणाईत मोठी चर्चा रंगते. त्याचप्रमाणे, अनेक Android कंपन्यांनी अॅपलची डिझाईन कॉपी केली आहे. आणि आपले मोबाईल कमी रेंजमध्ये उपलब्ध करून दिले आहेत.

गेल्या वर्षी Apple ने iPhone 14 सीरिज सादर केली होती. पण, महागड्या किंमतीमुळे सगळ्यांनाच ते विकत घेणं शक्य नव्हतं. मात्र, एका चिनी कंपनीने हे शक्य करण्याचा प्रयत्न केला आहे. LeEco नावाच्या चायनीज ब्रँडने LeEco S1 Pro फोन लॉन्च केला आहे, जो अगदी iPhone 14 Pro सारखाच दिसतो.

वैशिष्ट्यांमध्ये किती फरक आहे? (LeEco S1 Pro Features) :

जर आपण LeEco A1 Pro च्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 14 Pro सारखे आहे. यात 60HZ रिफ्रेश रेटसह 6.5-इंचाचा LCD डिस्प्ले आहे. या फोनमध्ये आयफोनच्या डायनॅमिक आयलंडसारखे नोटिफिकेशन फीचर आहे. या फोनचे तीन प्रकार आहेत ज्यात 4GB + 64GB, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB. यात Unisoc T7150 चिपसेट प्रोसेसर आहे.

news reels

विशेष म्हणजे LeEco S1 Pro मध्ये मागील बाजूस तीन कॅमेरे आहेत आणि प्लेसमेंट iPhone 14 Pro वरील सेन्सर्ससारखेच आहे. फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि फ्रंट नॉचमध्ये 5-मेगापिक्सलचा स्नॅपर आहे. याशिवाय फोनमध्ये 10W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. त्याच वेळी, iPhone 14 Pro 20W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

किंमत किती? (LeEco S1 Pro Price) :

LeEco S1 Pro फोन, iPhone 14 Pro सारखाच फोन आहे. हा फोन सध्या चीनी बाजारात उपलब्ध आहे. हा फोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 899 युआन म्हणजेच 10,897 रुपये आहे. हा फोन चीन व्यतिरिक्त कुठेही उपलब्ध नाही. यापूर्वी लॉन्च केलेल्या LeEco S1 ची किंमत 8 हजारांपेक्षा कमी होती, जी iPhone 14 ची कॉपी होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

Most Expensive Iphone: ‘या’ देशांमध्ये भारतापेक्षाही महाग आहेत iPhones, आयफोन 14 ची किंमत ऐकून व्हाल थक्क

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here