नवी दिल्लीः खूप साऱ्या हाइप नंतर प्रीमियम टेक कंपनी वनप्लसकडून स्वस्तातील फोन वनप्लस नॉर्ड लाँच करण्यात आला आहे. वनप्लसचा हा फोन खरेदी करण्याआधी थोडे थांबले तर बरे होईल, कारण, गुगल या फोनला टक्कर देण्यासाठी पिक्सल डिव्हाइस आणि कमी किंमतीत फोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. संबंधित काही लिक्स माहिती समोर आली आहे. हा आता पर्यंतचा सर्वात स्वस्त गुगल पिक्सल डिव्हाईस असू शकतो.

वाचाः

गुगलचा नवीन डिव्हाईस स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर सोबत येवू शकतो. याच्या गिक बेंच लिस्टिंगमध्ये दिसले आहे. Tom’s Guide च्या कडून शेयर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, Geekbench 5 लिस्टिंग मध्ये LTE Pixel 4a स्नॅपड्रॅगन च्या मिडरेंज चिपसेट सोबत दिसला आहे. गुगल या फोनचे दोन व्हेरियंट ५ जी आणि एलटीई आणू शकतो. तसेच LTE व्हेरियंटची किंमत स्टँडर्ड व्हेरियंटच्या तुलनेत कमी असू शकते.

वाचाः

बेंचमार्कवर इतके पॉइंट
लिस्टिंगमध्ये हा डिव्हाईस ६ जीबी रॅम शिवाय अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमसोबत दिसला आहे. बेंचमार्क स्कोरमध्ये सिंगल कोर टेस्टमध्ये या फोनला ५५१ पॉइंट्स मिळाले आहे. तर मल्टी कोर टेस्टमध्ये पिक्सल ४ ए चे स्कोर १६५५ पॉइंट्स आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Pixel 3a च्या तुलनेत हे जबरदस्त आहे. याला सिंगल आणि मल्टी कोर टेस्टमध्ये ३४४ आणि १२८७ पॉइंट्स मिळाले होते.

वाचाः

फीचर्स आणि किंमत
समोर आलेल्या डिटेल्सनुसार, Pixel 4a ची किंमत ३४९ डॉलर (२६ हजार रुपये) च्या जवळपास असू शकते. हा फोन iPhone SE आणि पेक्षाही स्वस्त असू शकतो. गुगलच्या ऑप्टिमाइज्ड ओएस आणि कॅमेऱ्यात जबरदस्त परफॉर्मन्स मिळू शकतो. तसेच यात ५.८१ इंचाचा पंच होल डिस्प्ले शिवाय १२.५ मेगापिक्सलचा प्रायमरी आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here