नवी दिल्लीः चीनला आणखी एक जबरदस्त झटका देत भारताने ४७ चायनीज अॅप्सवर बंदी घातली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हे अॅप मागच्या महिन्यात बंदी घातलेल्या ५९ चायनीज अॅप्सचे क्लोन म्हणून काम करीत होते. या अॅप्सला बंदी घालण्याचा निर्णय आयटी मिनिस्ट्रीकडून घेण्यात आला आहे. बंदी घालण्यात आलेल्या ४७ अॅप्समध्ये कोणकोणत्या अॅप्सचा समावेश आहे, याची यादी लवकरच जारी करण्यात येणार आहे.

वाचाः

२५० हून अधिक अॅप्सवर नजर
४७ अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे तसेच आणखी २५० हून अधिक अॅप्सवर सरकारची नजर आहे. सध्या या अॅप्सची तपासणी सुरू आहे. यात शाओमीचे १४ अॅप्स शिवाय , Resso आणि ULike यासारख्या अॅप्सचा समावेश आहे. तर, दुसरीकडे चीनच्या ज्या इंटरनेट आणि टेक कंपन्यांच्या अॅप्सवर सरकारची नजर आहे. यात Meitu, LBE Tech, Perfect Corp, Sina Corp, Netease Games, Yoozoo Global या अॅप्सचा समावेश आहे. यात अनेक छोटे आणि कमी प्रसिद्ध असलेल्या अॅप्स आहेत.

वाचाः

डेटाच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय
वादात चायनीज इंटरनेट कंपन्याचे अॅप्सवर भारत सरकारची करडी नजर आहे. या अॅप्सचा तपास सरकारकडून करण्यात येत आहे. सरकारचा प्रयत्न आहे की, या चायनीज अॅप्सच्या माध्यमातून भारतीय युजरच्या डेटाची सिक्योरिटी किंवा प्रायव्हसीला नुकसान पोहचवत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

वाचाः

गेल्या महिन्यात ५९ अॅप्सवर बंदी
याआधी केंद्र सरकारने गेल्या महिन्यात टिकटॉकसह ५८ दुसऱ्या अॅप्सवर बंदी घातली होती. यात कॅम स्कॅनर, शेयरइट आणि यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक मोठ्या अॅप्सचा समावेश होता. देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here