Iit Madras-Incubated Firm Develops BharOs: जगभरात अँड्रॉइड (Android) आणि अॅपलच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा दबदबा आहे. मात्र याला आता मोठं आव्हान निर्माण होणार आहे. आता भारतातील आयआयटी मद्रासच्या फर्मने एक स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम बनवली (OS) आहे. ज्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Central Minister Ashwini vaishnav) आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Central Education Minister) यांनी आज स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंगची BharOS ची यशस्वी चाचणी केली. हे सॉफ्टवेअर कमर्शिअल ऑफ-द-शेल्फ हँडसेटवर इनस्टॉल केले जाऊ शकते. केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वदेशी मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम ‘BharOS’ बद्दल सांगितले की, ‘जगभरात असे बरेच लोक आहेत जे अडचणी आणतील आणि अशी सिस्टम यशस्वी होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. अत्यंत काळजीपूर्वक आणि चिकाटीने प्रयत्न करून ते यशस्वी करण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल.” 

What is BharOS: काय आहे BharOS? 

BharOS, ज्याला भारोस देखील म्हणतात, ही एक स्वदेशी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टम आहे. ही मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासच्या (IIT Madras)  इनक्यूबेटेड फर्मने विकसित केली आहे. भारतातील 100 कोटी मोबाईल फोन युजर्सला या ओएसचा फायदा होईल, असा दावा केला जात आहे. या OS ची खास गोष्ट म्हणजे यात हाय-टेक सेफ्टी आणि प्रायव्हसी फीचर्स आहेत. म्हणजेच या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये, युजर्सला त्यांच्या गरजेनुसार अॅप्स निवडण्यासाठी आणि वापरण्यासाठी अधिक स्वातंत्र्य, नियंत्रण आणि लवचिकता मिळते. BharOS कमर्शिअल ऑफ-द-शेल्फ हँडसेटवर इनस्टॉल केले जाऊ शकते. तसेच BharOS  कोणत्याही डीफॉल्ट अॅप्ससह येतो (NDA). याचा अर्थ असा की, युजर्सला माहित नसलेला किंवा सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ नसलेले अॅप वापरण्याची सक्ती केली जात नाही. हे मूळ OS युजर्सला त्यांच्या डिव्हाइसवर असलेल्या अॅप्सवर अधिक नियंत्रण देते.

किती सुरक्षित आहे BharOS? 

BharOS केवळ संस्था-विशिष्ट खाजगी अॅप स्टोअर सेवा (PASS) मधील विश्वसनीय अॅप्सना युजर्सच्या मोबाईलमध्ये प्रवेश देतो. याचा अर्थ युजर्स खात्री बाळगू शकतात की त्यांनी त्यांच्या डिव्हाइसवर इनस्टॉल केलेले अॅप्स हे पूर्णपणे सुरक्षित आहे.

 technology

4 COMMENTS

  1. The most effective trading bots that I’vе ever encountered, Quantum Ai, ѕo far,
    have satisfied all my questions ɑnd demonstrated thаt tney aare tһe
    most effective bots. Experientially, tһe experience was ѕomething tο discuss.
    Personally, my favourite robot іs Grid and the Moon bot.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here