नीरज पंडित

सोशल मीडियावर आपल्या भावाना व्यक्त करण्यासाठी हल्ली इमोजींचा वापर सर्वाधिक होतो. टि्वटरवर अशा प्रकारे कोणत्या इमोजीचा वापर सर्वाधिक झाला याचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

वाचाः

लॉकडाउनच्या काळात इमोजीच्या वापरात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, सर्वाधिक वापर हा आनंदाश्रू ढाळणाऱ्या इमोजीचा झाल्याचं टि्वटरनं स्पष्ट केलंय. १ जानेवारी ते १० जुलै या कालावधीत पिवळ्या चेहऱ्याच्या, आनंदाश्रू ढळणाऱ्या चेहऱ्याच्या इमोजीच्या वापरात कमालीची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर ओक्साबोक्शी रडणाऱ्या चेहऱ्याच्या इमोजीच्या वापरातही मोठी वाढ झाल्याचं टि्वटरनं सांगितलं. दैनंदिन जीवनात वापरात असलेल्या, उदाहणार्थ मेट्रो, लोकल सेवा अशा सेवांची आठवण काढणाऱ्या इमोजींचा ट्विट्समध्ये वापर वाढला आहे.

वाचाः

विनवणी करणाऱ्या चेहऱ्याच्या इमोजीच्या वापरात तब्बल ४१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कालावधीत विविध प्रकारची मागणी करणाऱ्या ट्विटमध्ये याचा सर्वाधिक वापर झाल्याचं ट्विटरनं स्पष्ट केलंय. तर ‘आरओएफएल’ चौथ्या स्थानावर आलाय. विविध विषयांवर होणाऱ्या विनोदांमध्ये या इमोजीचा सर्वाधिक वापर झाल्याचं टि्वटरनं स्पष्ट केलंय. या कालावधीत एकटेपणा, अपराधी भावना, नाराजी व्यक्त करण्यासाठी युजर्सनी चिंताजनक चेहऱ्याचा इमोजी जास्तीत जास्त वापरला. तर या काळात आगीच्या इमोजीच्या वापरात आश्चर्यकारकरित्या २९० टक्के इतकी वाढ झाली आहे. यामुळे प्रथमच हा इमोजी टॉप १०मध्ये सातव्या स्थानावर आलाय. तर हृदयाचं चित्र असलेल्या हसऱ्या चेहऱ्याचा इमोजी आठव्या स्थानावर असून, याचा वापर तब्बल ११९ टक्क्यांनी वाढलाय. भिरभिरणाऱ्या डोळ्यांचा इमोजी आणि विचार करणारा इमोजी अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहे. भिरभिरणाऱ्या डोळ्यांच्या इमोजीच्या माध्यमातून लोकांनी नैराश्य आणि नाराजी व्यक्त केली आहे. तर यंदा ‘थँक यू’ या इमोजीचाही वापर तब्बल ८९ टक्क्यांनी वाढलाय.

वाचाः

मास्कच्या इमोजीच्या वापरात १२८ टक्के वाढ

या कालावधीत ड्रायव्हिंग, प्रवास, सौंदर्य प्रसाधनं अशा विविध प्रकारच्या इमोजींचा वापर मोठ्या प्रमाणावर कमी झाला. मागच्या वर्षीच्या तुलनेत याचा वापर उणे ५० टक्क्यांपर्यंत घसरला आहे. तर मास्कच्या इमोजीच्या वापरात १२८ टक्के इतकी वाढ झाली असून, या इमोजीनं चौथ्या क्रमांकावर स्थान पटकावलं आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here