Smartphone Offers : नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर, यापेक्षा चांगली संधी मिळूच शकत नाही. सध्या फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये ऑफर्सचा पाऊस पडत आहे. सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट उपलब्ध आहे. सेल २४ जानेवारी 2023 रोजी सुरू झाला असून ३१ जानेवारी २०२३ पर्यंत लाईव्ह असेल. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी ही योग्य वेळ असू शकते. Realme चे महागडे फोन सेलमध्ये स्वस्त दरात उपलब्ध आहेत. फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणता फोन सर्वोत्तम असेल ते जाणून घ्या. लिस्टमध्ये Realme 9 5G (6GB रॅम, 128GB स्टोरेज), Realme 10 Pro 5G, Realme 10 Pro+ 5G, Realme GT Neo 3T 5Gसारख्या फोन्सचा समावेश असेल.

Realme GT Neo 3T

realme-gt-neo-3t

Realme GT Neo 3T 5G (8GB रॅम, 128GB स्टोरेज): Realme GT Neo 3T (8GB RAM आणि 128GB स्टोरेज) MRP ३६,९९९ सह व्हेरिएंट फक्त ३१,९९९ रुपयांमध्ये ५००० रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. ग्राहक फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरून पाच टक्के कॅशबॅक घेऊ शकतात. याशिवाय, फोनवर २५,५०० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.६२ -इंच फुल एचडी + डिस्प्ले आहे आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरवर चालतो. यात ५००० mAh बॅटरी आहे आणि यात ६४ -मेगापिक्सलचा मागील कॅमेरा सेटअप आणि १६ -मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे.

Realme 10 Pro+ 5G

realme-10-pro-5g

Realme 10 Pro+ 5G (6GB रॅम, 128GB स्टोरेज): Realme 10 Pro+ 5G (6GB RAM आणि 128GB स्टोरेज) २४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरून पाच टक्के कॅशबॅक घेऊ शकतात. याशिवाय फोनवर २०,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये ६.७ -इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे आणि तो MediaTek Dimensity 1080 5G चिपसेटद्वारे सपोर्टेड आहे. यात ५००० mAh बॅटरी आहे आणि १०८ मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

Realme 10 Pro 5G

realme-10-pro-5g

Realme 10 Pro 5G (8GB रॅम, 128GB स्टोरेज): २२,९९९ रुपयांच्या MRP सह Realme 10 Pro 5G (8GB RAM आणि 128GB स्टोरेज) व्हेरिएंट फक्त १९,९९९ रुपयांमध्ये ३००० रुपयांच्या सूटसह उपलब्ध आहे. ग्राहक फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड वापरून पाच टक्के कॅशबॅक घेऊ शकतात. याशिवाय, फोनवर १८,५०० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरही उपलब्ध आहेत. फोनमध्ये ६.७२ -इंच फुल एचडी + डिस्प्ले आहे आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसरवर काम करतो . यात ५००० mAh बॅटरी आहे आणि यात १०८-मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आणि १६-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.

Realme 9 5G

realme-9-5g

Realme 9 5G (6GB रॅम, 128GB स्टोरेज): Flipkart वर Realme 9 5G (6GB RAM आणि 128GB स्टोरेज) व्हेरिएंटची MRP २०,९९९ रुपये आहे. परंतु, फोन केवळ १५,४९९ रुपयांमध्ये ५५०० रुपयांच्या सवलतीत उपलब्ध आहे. बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही फोनवर १० टक्क्यांपर्यंत सूट मिळवू शकता. याशिवाय, फोनवर १४,८५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही मिळू शकते. फोनमध्ये ६.५ -इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे आणि तो MediaTek Dimensity 810 प्रोसेसरद्वारे सपोर्टेड आहे. यात ५००० mAh बॅटरी आहे आणि यात ४८ -मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि १६-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here