Best Airtel Plans And Their Benefits: तुम्ही जर एरटेल युजर असाल आणि तुम्हाला लाइव्ह टीव्ही, चित्रपट आणि शोचा मोफत आनंद घ्यायचा असेल, तर एअरटेलने तुमचे काम सोपे केले आहे. एअरटेल अशा ग्राहकांना आयफोन 14 जिंकण्याची संधीही देत आहे. नामांकित टेलिकॉम कंपनी भारती एअरटेल आपल्या युजर्सना डेटा वापरण्यासाठी आणि आवडत्या कन्टेन्टचा आनंद घेण्यासाठी OTT लाभांसह अमर्यादित प्लान्स ऑफर करते. एअरटेल त्याच्या इन-हाउस डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, Airtel Xstream द्वारे OTT कन्टेन्ट देखील ऑफर करते. एअरटेल त्याच्या काही अमर्यादित प्रीपेड प्लॅनवर Xstream अॅपचा लाभ देते, ज्यामध्ये युजर्स थेट टीव्ही, चित्रपट आणि शोचा आनंद घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला एअरटेल एक्सस्ट्रीम अॅपसह येणाऱ्या प्रीपेड प्लान्सबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या एअरटेलच्या या भन्नाट प्लान्सबद्दल आणि त्यांच्या किमतींबद्दल सविस्तर

Airtel 839 Plan

airtel-839-plan

एअरटेलचा ८३९ रुपयांचा रिचार्ज प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स, दररोज १०० एसएमएस आणि दररोज 2GB डेटा ऑफर करतो. यासह, तुम्ही एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप, डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलवर ३ महिन्यांसाठी, कॅशबॅक, मोफत एअरटेल विंक म्युझिक, मोफत हॅलोट्यून्स, अपोलो २४/७ सर्कल आणि फास्टॅग फायद्यांचा आनंद घेऊ शकता.

एअरटेलचा ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान : प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २.५ GB डेटा ऑफर करतो. कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय Airtel Xstream अॅपचा आनंद घेऊ शकता, Disney+ Hotstar मोबाइल 3 महिन्यांसाठी मोफत, Amazon Prime सदस्यत्व ८४ दिवसांसाठी, मोफत Airtel Wynk Music, मोफत Hellotunes, Apollo 24/7 Circle आणि FASTag वर कॅशबॅकचा आनंद घेऊ शकता.

Airtel 719 Plan

airtel-719-plan

७१९ रुपयांचा प्लान: Airtel चा ७१९ रुपयांचा रिचार्ज प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित व्हॉइस, दररोज १०० SMS आणि दररोज १.५ GB डेटा ऑफर करतो. या रिचार्जसह, तुम्ही एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप, डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलवर ३ महिन्यांसाठी कॅशबॅक, मोफत एअरटेल विंक म्युझिक, मोफत हॅलोट्यून्स, अपोलो २४/७ सर्कल आणि फास्टॅग फायद्यांचा आनंद घेऊ शकता.

Airtel चा १४८ रुपयांचा डेटा पॅक : हा डेटा अॅड-ऑन तुम्हाला सध्याच्या पॅक वैधतेसह Airtel Xstream अॅपच्या फायद्यांसह १५ GB बल्क डेटा ऑफर करतो.

Airtel 549 Plan

airtel-549-plan

५४९ रुपयांचा प्लान: या प्लानमध्ये ५६ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल, 100 SMS आणि 2GB दैनिक डेटा मिळतो. तुम्ही एअरटेल एक्सस्ट्रीम अॅपवर कॅशबॅक, मोफत एअरटेल विंक म्युझिक, मोफत हॅलोट्यून्स, अपोलो 24/7 सर्कल आणि फास्टॅग फायद्यांचा कोणताही अतिरिक्त खर्च न करता आनंद घेऊ शकता.

६९९ रुपयांचा प्रीपे प्लान: रिचार्ज प्लान ५६ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स, दररोज 100 SMS आणि दररोज 3GB डेटा ऑफर करतो. युजर्स एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप, ५६ दिवसांसाठी अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप, मोफत एअरटेल विंक म्युझिक, फ्री हॅलोट्यून्स, अपोलो 24/7 सर्कल आणि FASTag वर कॅशबॅकचा आनंद घेऊ शकतात.

Airtel 359 Plan

airtel-359-plan

एअरटेलचा ३५९ रुपयांचा प्रीपेड प्लान: रिचार्ज प्लान ३० दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल, दररोज १०० एसएमएस आणि दररोज 2GB डेटा ऑफर करतो. तुम्ही एअरटेल एक्सस्ट्रीम अॅप, मोफत एअरटेल विंक म्युझिक, मोफत हॅलोट्यून्स, अपोलो 24/7 सर्कल आणि FASTag वर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय कॅशबॅकचा आनंद घेऊ शकता. महत्वाचे म्हणजे Airtel सध्या त्यांच्या युजर्सना Apple iPhone 14 जिंकण्याची संधी देत आहे, जे Hoichoi ला वैशिष्ट्यीकृत Xstream चॅनल म्हणून दावा करतात आणि त्याचे शो पाहतात. ही ऑफर २९ जानेवारी २०२३ रोजी संपेल.

Airtel Xstream

airtel-xstream

Airtel Xstream :Airtel Xstream हे टेल्कोचे इन-हाउस डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा वापर करून युजर्स थेट टीव्ही पाहू शकतात . चित्रपट आणि शो स्ट्रीम करू शकता. अॅप वापरून तुम्ही तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, बंगाली, मल्याळम आणि हॉलीवूड कन्टेन्ट पाहू शकता. Airtel Xstream अॅप Android आणि iOS प्लॅटफॉर्मवर आणि डेस्कटॉप आवृत्ती म्हणून उपलब्ध आहे. एअरटेल सहा प्रीपेड रिचार्ज प्लान्स आणि एक डेटा अॅड-ऑन पॅक ऑफर करते, जे Airtel Xstream अॅपचा लाभ देते. ग्राहक निवडलेल्या Xstream चॅनेलपैकी १ निवडू शकतात आणि Xstream अॅपवर कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय त्यांच्या आवडत्या कन्टेन्टचा आनंद घेऊ शकतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here