Amazon Job : तुम्हाला देखील Amazon कंपनीत वर्क फॉर्म होम नोकरी देण्याचा दावा करणारे मेसेज येत आहेत का? जर तुमचं उत्तर हो असं असेल तर सावधान, दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीने वर्क फॉर्म होमचा बनाव करून सुमारे 11 हजार लोकांची फसवणूक केली आहे. या सायबर ठगांची टोळी चीन आणि दुबईमध्ये असून त्यांचा मास्टरमाईंड जॉर्जियामध्ये आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत सायबर फसवणुकीत गुंतलेल्या तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात दिल्ली, गुरुग्राम आणि फतेहाबाद (हरियाणा) येथून वेगवेगळ्या छाप्यांमध्ये गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.
घरबसल्या नोकरीच्या शोधात असलेल्यांना याचा बसला फटका
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या तपासादरम्यान त्यांना असे आढळून आले की, चिनी सायबर गुन्हेगारांनी वर्क फॉर्म होम (work from home jobs) किंवा पार्ट टाइम नोकरी शोधणाऱ्या लोकांची फसवणूक करण्यासाठी एक मॉड्यूल तयार केले आहे. पार्ट टाइम नोकरीच्या शोधात असलेल्या एका महिलेची 1.18 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. असे म्हटले जात आहे की, या सायबर ठगांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी टेलिग्राम आयडीचा वापर केला आहे. हा आयडी बीजिंग चीनमधून कार्यरत होता. ज्या व्हॉट्सअॅप नंबरवरून लोकांना अॅमेझॉन साइटवर गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले होते तोही भारताबाहेरचा होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना एक तक्रार प्राप्त झाली होती. ज्यामध्ये एका महिलेने तक्रार दाखल केली होती की, काही अज्ञात घोटाळेबाजांनी Amazon मध्ये ऑनलाइन पार्ट टाइम नोकरी देण्याच्या नावाखाली तिची 1.18 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, हा एक मोठी प्लान सुरू आहे, जो काही लोक अॅमेझॉन कंपनीच्या नावाने करत आहेत. वस्तुस्थिती तपासल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
Amazon सारखी वेबसाइट डिझाइन
नोकरी शोधणाऱ्यांना चेतावणी देताना दिल्ली पोलीस म्हणाले की, हे लोक वेबसाइट्स अशा प्रकारे डिझाइन करतात की ते वास्तविक अॅमेझॉन वेबसाइटसारखे दिसते. इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया वेबसाइटवरही अशा बनावट वेबसाइट्सचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला जातो. घोटाळेबाज पीडितांना चांगले पैसे कमावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे बनावट स्क्रीनशॉटही दाखवतात.
reels
हेही वाचा:
technology
buy cialis 5mg daily use Kardiotoxizität Herzinsuffizienz wurde bei Patienten beobachtet, die Docetaxel in Kombination mit Trastuzumab erhielten, vor allem nach einer Chemotherapie mit einem Anthrazyklin Doxorubicin oder Epirubicin
cialis prescription online I was actually surprised its reduced, im hoping it doesnt come back tomorrow