Upcoming Smartphones In February 2023 : तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर, काही काळ प्रतीक्षा करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. कारण, फेब्रुवारीमध्ये अनेक स्मार्टफोन लाँच होणार आहेत. Samsung Galaxy S23 सीरीज ते OnePlus 11 पुढील महिन्यात मार्केटमध्ये एंट्री करण्यास सज्ज आहेत. आज येथे आम्ही तुम्हाला फेब्रुवारीमध्ये लाँच होणाऱ्या फोनबद्दल सविस्तर माहिती देणार आहो. जानेवारी संपत आला असून आज या महिन्याचा अखेरचा दिवस आहे. फेब्रुवारीमध्ये लाँच होणाऱ्या फोन्सच्या लिस्टमध्ये मध्ये अनेक दमदार स्मार्टफोन्सचाही समावेश करण्यात आला आहे. येत्या महिन्यात, Samsung Galaxy S23 सीरीज फोन व्यतिरिक्त OnePlus 11 देखील सादर केला जाईल. अशात तुम्ही स्वतःसाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, या लिस्टवर एक नजर नक्की टाका आणि त्यापैकी कोणता फोन खरेदी करायचा ते ठरवा .

Realme GT Neo 5

realme-gt-neo-5

Realme GT Neo 5: Realme GT Neo 5 पुढील महिन्यात चीनमध्ये लाँच होऊ शकतो. या हँडसेटबद्दल बोलले जात आहे की, यामध्ये 240watt SuperVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते. या फोनबाबत असा दावा केला जात आहे की, Realme GT Neo 5 स्मार्टफोन 9 मिनिटांपेक्षा कमी वेळेत चार्ज होऊ शकतो.

Oppo Reno 8T: Oppo Reno 8T देखील पुढील महिन्यात लाँच होऊ शकतो. यामध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर दिला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. फोनच्या मागील बाजूस १०८ मेगापिक्सल कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Vivo X90

vivo-x90

Vivo X90 Series: यात Vivo X90, Vivo X90 Pro आणि Vivo X90 Pro+ लाँच केले जातील. या सीरिजमध्ये १२० वॅट फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान दिले जाऊ शकते. याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा दिला जाऊ शकतो. Vivo X90 मध्ये ६.७८ -इंचाचा FHD + OLED डिस्प्ले आहे. फोन १२० Hz रिफ्रेश रेट आणि १२०० nits पीक ब्राइटनेससह येतो. Vivo X90 5G मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्ट आहे. Vivo X90 स्मार्टफोन Android 13 आधारित OriginOS 3 वर काम करतो. Vivo X90 स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 9200 चिपसेट सपोर्ट दिला जाईल.

OnePlus 11

oneplus-11

OnePlus 11: OnePlus 11 नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनी हा फ्लॅगशिप फोन ७ फेब्रुवारीला भारत आणि इतर जागतिक बाजारात लाँच करेल. या हँडसेटमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. वनप्लसचा हा स्मार्टफोन अमरेल्ड ग्रीन आणि वोल्केनिट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

iQoo Neo 7 5G: iQoo Neo 7 5G 16 फेब्रुवारी रोजी लाँच होईल. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 चिपसेट देण्यात आला आहे. ऑनलाइन कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनने यासाठी मायक्रोसाइटही तयार केली आहे. यामुळे त्याची उपलब्धता आणि अनेक फीचर्सची माहिती समोर आली आहे.

Xiaomi 13 सीरिज

xiaomi-13-

Xiaomi 13 सीरिज: Xiaomi 13 सीरीज फेब्रुवारीमध्ये लाँच होऊ शकते. यात Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro लाँच केले जातील. हँडसेट चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. नवीन शाओमी १३ सीरीज मध्ये Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro व्हेरियंट लाँच करण्यात आले आहे. या दोन्ही डिव्हाइस मध्ये अनेक अपग्रेड करण्यात आले आहेत. Xiaomi 13 मध्ये ६.३६ इंचाचा फ्लॅट अमोलेड स्क्रीन आहे, जी फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन ऑफर करते. तर, Xiaomi 13 Pro व्हेरियंट मध्ये ६.७३ इंचाचा QHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S23

samsung-galaxy-s23

Samsung Galaxy S23 सीरिज: Samsung Galaxy S23 series १ फेब्रुवारी रोजी लाँच होणार आहे. Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23+ आणि Samsung Galaxy S23 Ultra यात लाँच केले जातील. हे सॅमसंग फोन Android 13 आधारित One UI 5.1 सह ऑफर केले जातील. Galaxy S23 मध्ये ६.१ इंचाचा फुल HD Plus AMOLED 2X डिस्प्ले मिळेल. तर, Galaxy S23+ ला HDR10+ सपोर्ट आणि Gorilla Glass Victus 2 संरक्षणासह ६.६ इंचाचा डिस्प्ले मिळेल. सर्व फोन Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर आणि किमान 8 GB RAM सह ऑफर केले जातील. रिपोर्टनुसार, यामध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here