Validity Plans : आजकाल अनेक युजर्स लॉंग व्हॅलिडिटीसह येणारे प्लान्स खरेदी करण्यास प्राधान्य देतात. याचा प्रमुख फायदा म्हणजे, सतत रिचार्ज करण्याचे टेन्शन राहत नाही. तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास नको असेल तर, तुम्ही ८४ दिवसांच्या प्लानचा विचार करू शकता. २०२३ मध्ये, एअरटेल भारतातील ग्राहकांसाठी ८४ दिवसांच्या वैधतेसह चार प्रीपेड प्लान्स ऑफर करत आहे. एअरटेलच्या या चार अमर्यादित प्रीपेड प्लान्सची किंमत ४५५ रुपये, ७१९ रुपये, ८३९ रुपये आणि ९९९ रुपये आहे. आज आम्ही तुम्हाला या चार प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी सविस्तरपणे माहिती देणार आहोत, जेणेकरून तुमच्यासाठी कोणता प्लान बेस्ट आहे हे तुम्ही सहजपणे ठरवू शकता. यातील काही प्लान्समध्ये RewardsMini सबस्क्रिप्शन, तीन महिन्यांसाठी Apollo 24×7, FASTag वर १०० रुपयांचा कॅशबॅक आणि मोफत विंक म्युझिक यासारखे फायदा देखील मिळतात.

airtel 5g

airtel-5g

या प्लान्ससह 5G चा आनंद घ्या: एअरटेल ग्राहक विद्यमान प्लान वापरून Airtel 5G Plus नेटवर्कचा आनंद घेऊ शकतात. त्यामुळे, ८४ दिवसांच्या वैधतेसह या चारही एअरटेल प्रीपेड प्लानवर ग्राहक 5G प्लस उपलब्धता असलेल्या शहरांमध्ये 5G सेवांचा आनंद घेऊ शकतात. Airtel 5G Plus भारतातील ६७ शहरांमध्ये उपलब्ध आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी अलीकडेच लाँच केले गेले आहे. तसेच, एअरटेलने देशाच्या उत्तरेकडील जम्मू आणि काश्मीर राज्यातील ७ शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या शहरांमध्ये युजर्सना हाय-स्पीड 5G इंटरनेटचा लाभ जुन्या सिमवर मिळेल.

Airtel 999 Plan

airtel-999-plan

Airtel चा ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान: ९९९ रुपयांचा प्रीपेड प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लान आहे. हा प्लान अनेक OTT फायदे आणि भारी दैनिक डेटा मर्यादेसह येतो. प्लानमध्ये ८४ दिवसांच्या वैधतेसह अमर्यादित कॉल्स, दररोज २.५ GB डेटा आणि दररोज १०० SMS मिळतात. डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होईल. प्लॅनमध्ये ३ महिन्यांसाठी Disney + Hotstar Mobile, 84 दिवसांसाठी Amazon Prime सदस्यत्व आणि ८४ दिवसांसाठी Airtel Xstream अॅपचा लाभ मिळतो. प्लॅनमध्ये RewardsMini सबस्क्रिप्शन, तीन महिन्यांसाठी Apollo 24×7, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि मोफत विंक म्युझिक यांसारख्या फायद्यांचा समावेश आहे.

Airtel 839 Plan

airtel-839-plan

Airtel चा ८३९ रुपयांचा प्लान: तुम्हाला OTT फायद्यांसह अधिक डेटा हवा असल्यास, हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकते. Airtel चा ८३९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान ७१९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचे सर्व फायदे देतो.शिवाय, ८३९ रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ GB डेटा मिळतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होईल. एअरटेल थँक्स अॅपद्वारे रिचार्ज केल्यावर ग्राहकांना अॅप एक्सक्लुझिव्ह मोफत २ GB डेटा कूपनचा आनंदही घेता येईल. तसेच, तुम्ही या प्लानसह Airtel Xstream अॅपच्या फायद्यांसह Shark Tank 2 पाहू शकता. प्लानची रोजची किंमत ९.९८ रुपये असेल.

Airtel 719 plan

airtel-719-plan

Airtel चा ७१९ रुपयांचा प्रीपेड प्लान: जर तुम्ही मध्यम डेटासह OTT लाभांसह प्लान शोधत असाल, तर Airtel चा ७१९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते. प्लानमध्ये, तुम्हाला अमर्यादित लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलसह दररोज १०० एसएमएस आणि ८४ दिवसांच्या वैधतेसह दररोज १.५ जीबी डेटा मिळू शकतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी होईल. प्लान ग्राहकांना डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल 3 महिन्यांसाठी आणि एअरटेल Xstream अॅपवर ८४ दिवसांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क न घेता प्रवेश देते.

Airtel 455 Plan

airtel-455-plan

Airtel चा ४५५ रुपयांचा प्रीपेड प्लान: ८४ दिवसांची वैधता असलेल्या प्लानच्या शोधत असलेल्या युजर्ससाठी एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान ४५५ रुपयांचा आहे. या Airtel प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित लोकल, STD आणि रोमिंग कॉल्स, ९०० SMS आणि 6GB डेटा ८४ दिवसांच्या वैधतेसह मिळतो. डेटा मर्यादा संपल्यानंतर, ग्राहक ५० पैसे प्रति एमबी दराने इंटरनेट वापरू शकतात. या रिचार्जसह ग्राहकांना Apollo 24×7 चे अतिरिक्त फायदे, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक आणि Wynk Music मोफत तीन महिन्यांसाठी मिळतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here