Alexa: अॅमेझॉन (Amazon) या कंपनीनं व्हर्जुअल असिस्टंट Alexa ला 2022 मध्ये लोकांनी विचारलेल्या काही प्रश्नांची माहिती दिली आहे. अनेक भारतीयांनी Alexa ला सलमानच्या लव्ह लाईफबाबत तसेच इतर सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारले आहेत. 

जानेवारी 2022 ते डिसेंबर 2022 या दिवसांमध्ये Alexa ला लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची यादी अमेझॉन कंपनीनं जाहीर केली आहे. यामध्ये कलाकरांबद्दलचे काही प्रश्न लोकांनी Alexa ला विचारले. पाहा प्रश्न : 

 1. सलमान खानचं लग्न कधी होणार?
 2. आलिया भट्टचं वय किती?
 3. अनुष्का शर्माच्या मुलीचं नाव काय?
 4. कतरिनाची उंची किती?
 5. मिस्ट बिस्ट कोण आहे? 
 6. रश्मिका मंदनाबद्दल सांगा? 
 7. रॉकी भाई कोण आहे? 
 8. कटप्पानं बाहुबलीला का मारलं? 
 9. लाल सिंह चड्ढा कोण आहे?
 10.  शोलेमधील डायलॉग्स सांग
 11. लिटल सिंघम कोण आहे?

जनरल नॉलेजचे प्रश्न

 1. एलॉन मस्कची संपत्ती किती?
 2. प्रिन्स ऑफ बिटकॉइन म्हणजे काय?
 3. जगातील सर्वात उंच व्यक्ती कोणता? 

अशा प्रकारचे जनरल नॉलेजचे प्रश्न लोकांनी Alexa ला विचारले आहेत.  

लोकांनी विचारल्या ‘या’ पदार्थांच्या रेसिपी

Alexa ला लोकांनी काही पदार्थांच्या रेसिपी देखील विचारल्या आहेत. पाहा Alexa युझर्सचे काही प्रश्न… 

 1. चिकन करीची रेसिपी काय आहे? 
 2. मसाला टी कसा तयार करतात?
 3. पनिर बटर मसाला ही डिश कशी तयार करतात? 
 4. अंडा बिर्याणी कशी तयार करतात?
 5. डोसा कसा बनवायचा?
 6. मसाला पनीर टिक्का पिझ्झा कसा बनवायचा?
 7.  ब्राऊन राइससोबत चिकन बिर्याणी कशी बनवायची?

2022 या वर्षात अनेक स्पोर्ट्स इव्हेंट झाले. कॉमनवेल्थ गेम्स, T20 वर्ल्ड कप आणि फिफा वर्ल्ड कप यांसारखे स्पोर्ट्स इव्हेंट्स या वर्षात झाले. लोकांनी स्पोर्टबाबत देखील अनेक प्रश्न Alexa ला विचारले. लोकांनी फुटबॉलच्या संबंधित देखील प्रश्न Alexa ला विचारले आहेत. 

 1.  सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू कोण आहे?
 2.  रोनाल्डो की मेस्सी? कोण चांगला खेळाडू आहे?
 3.  स्कोअर काय आहे?
 4. आजचा मॅच रन रेट?
 5. आज मॅन ऑफ द मॅच कोण ठरले?

काही अतरंगी प्रश्न…

लोकांनी Alexa ला काही अतरंगी प्रश्न देखील विचारले. पाहा प्रश्न…

 1. टूथपेस्टमध्ये मीठ असते का?
 2. मी अंघोळ करू का? 
 3. Alexa, तुझा पती कोण आहे? 
 4. Alexa, तू माझा होम वर्क करशील का? 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Meme Guy : Xavier चे मीम्स तुफान चर्चेत, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स; भन्नाट कमेंट करून हसवणारा ‘हा’ व्यक्ती नक्की आहे तरी कोण?

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here