नवी दिल्लीः चा स्मार्टफोन चा आज दुपारी १२ वाजता सेल आहे. आता पर्यंत झालेल्या सेल मध्ये ६ जीबी व्हेरियंटचा सेल विक्रीसाठी उपलब्ध होता. आज पहिल्यांदा हा फोन ८ जीबी रॅमचा फोन या सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. या नवीन व्हेरियंटला कंपनीने अधिकृतपणे वेबसाइटवरून खरेदी केले जावू शकते. या फोनची भारतात खूप मोठी मागणी आहे. आतापर्यंत झालेल्या फ्लॅश सेलमध्ये फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रत्येक फ्लॅश सेलमध्ये फोन अवघ्या काही मिनिटात आऊट ऑफ स्टॉक होतो. 8GB + 128 व्हेरियंटची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनच्या किंमतीत नुकतीच ५०० रुपये वाढ केली आहे.

वाचाः

किंमत आणि फीचर्स
रेडमी नोट ९ प्रो मॅक्सची सुरुवातीची किंमत १६ हजार ४९९ रुपये आहे. या किंमतीत फोन ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटमध्ये खरेदी केला जावू शकतो. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. अॅमेझॉनवरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना नो कॉस्ट आणि स्टँडर्ड ईएमआय ऑप्शन निवडण्याची संधी आहे. तर प्राईम मेंबर्स जर अॅमेझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ५ टक्के डिस्काउंटचा फायदा मिळणार आहे.

वाचाः

६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा
रेडमीच्या या स्मार्टफोनच्या रियरमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या रियरमध्ये मेन कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. तसेच, फोनच्या रियरमध्ये अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससोबत ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनच्या बॅकला ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

वाचाः

पॉवरफुल बॅटरी आणि प्रोसेसर
या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल HD+ IPS डिस्प्ले दिला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोर क्वॉलकॉम 720G प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम दिली आहे. फोनमध्ये १२८ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेजला ५१२ जीबीपर्यंत वाढवता येवू शकते. या फोनमध्ये 5,020 mAh बॅटरी दिली आहे. 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here