वाचाः
Realme C11 ची किंमत-ऑफर्स
या फोनला २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजमध्ये उतरवले आहे. या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये ठेवण्यात आली आहे. फोन रिच ग्रीन आणि रिच ग्रे या दोन रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. एसबीआय कार्ड किंवा ईएमआय ऑप्शनवरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. RuPay डेबिट कार्ड या यूपीआयकडून पहिला प्रीपेड ट्रांझॅक्शन करणाऱ्या युजर्संना ३० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तसेच कंपनी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास ५ टक्क्यांपर्यंत अनलिमिटेड कॅशबॅक आणि अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवर ५ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. फोनला ९ महिन्यांच्या ईएमआयवर सुद्धा खरेदी करता येवू शकते.
वाचाः
Realme C11 चे फीचर्स
रियलमी सी ११ मध्ये ६.५ इंचाचा एचडी (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ३ दिला आहे. फोनमध्ये २.३ गीगाहर्ट्ज ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर दिला आहे. हँडसेटमध्ये २ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे.
रियलमी सी ११ अँड्रॉयड १० बेस्ट रियलमी यूआय वर चालतो. फोन ड्यूल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. रियलमीचा हा फोन ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कॅमेऱ्यात एआय ब्यूटी, फिल्टर मोड, एचडीआर, पोर्ट्रेट मोड आणि टाइमलॅप्स यासारखे फीचर्स दिले आहेत. रियलमी सी ११ मध्ये पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. कनेक्टिविटीसाठी 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, मायक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आले आहेत.
वाचाः
२२ जुलै रोजी या फोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. ७ हजार ४९९ रुपये किंमत असलेल्या या फोनला भारतात प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या २ मिनिटात या फोनची १.५ लाख विक्री झाली आहे. या फोनमध्ये 5000 एमएएच आणि दोन रियर कॅमेरे देण्यात आले आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
These are actually great ideas in concerning blogging.
Thank you ever so for you article post.
Like!! Thank you for publishing this awesome article.