नवी दिल्लीः कंपनी आज आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी या फोनला सर्वात आधी भारतात लाँच करीत आहे. आता पर्यंत समोर आलेल्या बातम्यांनुसार कंपनीने या फोनमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिली आहेत. फोनसंबंधीत एक लीक झालेल्या रिपोर्टनुसार, टेक्नो स्पार्क ६ एयर ची किंमत ८ हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. स्वस्त किंमतीचा सर्वात मोठी बॅटरी आणि मोठी बॅटरी ऑफरचा हा स्मार्टफोन असणार आहे.

वाचाः

ट्विटर हँडलवर शेयर केला व्हिडिओ
फोनच्या लाँचिंगवरून युजर्संची एक्साइटमेंट ठेवण्यासाठी कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला आहे. १४ सेकंदाच्या या व्हिडिओत फोनच्या नावाशिवाय फारशी माहिती दिली नाही.

याआधी लाँच केला होता टेक्नो स्पार्ट २
याआधी कंपनीने भारतात 6000mAh बॅटरीचा टेक्नो स्पार्क २ स्मार्टफोन लाँच केला होता. हा फोन १० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच केला होता. फोनचा सेल नुकताच सुरू करण्यात आला होता.

वाचाः

४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो P22 एसओसी प्रोसेसर दिला आहे. फोनला मायक्रो एसडी कार्डचा सपोर्ट दिला आहे. गरज पडल्यास याचा स्टोरेज मेमरी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते.

फोनमध्ये ७ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. 1640×720 पिक्सल रेजॉलूशन सोबत येतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात १६ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here