नवी दिल्लीः चीनची प्रसिद्ध कंपनी शाओमीचा रेडमीचा दमदार आणि फ्लॅगशीप स्मार्टफोन ६ हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. कंपनीच्या अल्फा फ्लॅगशीप फोन २८ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. आता या फोनची सुरुवातीची किंमत कमी होऊन २४ हजार ९९९ रुपये झाली आहे. फोनला दोन स्टोरेज व्हेरियंट ६ जीबी प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी प्लस २५६ जीबी स्टोरेज मध्ये येतो.

वाचाः

रेडमी के २० प्रो चे खास वैशिष्ट्ये
फोनमध्ये 1080×2340 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.३९ इंचाचा अमोलेड फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजसोबत येणाऱ्या या फोनमध्ये ८५५ एसओसी प्रोसेसर दिला आहे.

वाचाः

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. यात सोनीचा IMX586 सेंसर चा ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा सेकंडरी शूटर आणि ८ मेगापिक्सलचा टर्शिअरी कॅमेरा मिळू शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा दिला आहे.

वाचाः

फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे. फोन लवकरच चार्ज व्हावा यासाठी यात २७ वॉट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी रेडमी के२० प्रो मध्ये 4G VoLTE, वाय-फाय 802.11 ac, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, जीपीएस/ A-जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि 3.5mm हेडफोन जॅक यासारखे फीचर्स दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here