वाचाः
कोणत्या प्लानची किंमत किती
टेलिकॉमटॉकच्या माहितीनुसार, कंपनीने सांगितले की, 2GB CUL प्लान चे शूल्क ३४९ रुपये होते. ते आता ३६९ रुपये करण्यात आले आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा 8Mbps च्या स्पीडने मिळतो. २ जीबी नंतर स्पीड कमी होऊन 1Mbps होते. तसेच या प्लानमध्ये बीएसएनएल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग व अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ६०० रुपयांची कॉलिंग मिळते. तसेच यात साडे दहा ते सकाळी ६ वाजेपर्यंत आणि रविवारी अनलिमिटेड कॉलिंग मिळते.
वाचाः
कंपनीने सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देणाऱ्या 2GB CUL प्लानच्या किंमतीत सुद्धा वाढ केली आहे. या प्लानची किंमत ३९९ रुपये होती. ती आता ४१९ रुपये करण्यात आली आहे. अनलिमिटेड कॉलिंग शिवाय यात सर्व सुविधा 2GB BSNL CUL प्लानमधील आहेत. याप्रमाणे कंपनीने 3GB CUL प्लानच्या किंमतीत ४९९ रुपयांवरून ५१९ रुपये केली आहे. 4GB CUL प्लानची किंमत ५९९ रुपयांवरून ६२९ रुपये, 5GB CUL प्लानची किंमत ६९९ रुपयांवरून ७२९ रुपये केली आहे.
वाचाः
हे दोन प्लान सुद्धा झाले महाग
कंपनीने Superstar 300 ची किंमत वाढून आता ७४९ रुपयांऐवजी ७७९ रुपये केली आहे. यात ग्राहकांना 300GB डेटा पर्यंत 10Mbps ची स्पीड मिळते. लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 2Mbps होते. यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच बीएसएनएलने 15GB CUL प्लानची किंमत ९९९ रुपयांऐवजी १०२९ रुपये झाली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times