नवी दिल्लीः रिलायन्स जिओने १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ४ जी एलटीई फोनच्या लाँचिंगनंतर धुमाकूळ घातला होता. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओने यानंतर जिओ फोन २ ला अपग्रेडेड व्हेरियंट म्हणून लाँच केले. जिओ फोन २ लाँच झाल्यानंतर सुद्धा जिओ फोनची विक्री होत आहे. जिओ फोन ६९९ रुपयांत खरेदी केला जात आहे. आता एक सर्वात स्वस्त हँडसेट बाजारात उतरवण्याची योजना बनवत आहेत. जिओ फोनचा स्वस्त व्हेरियंट म्हणून JioPhone 5 ला लाँच केले जावू शकते.

वाचाः

91Mobiles च्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली आहे. वर सध्या काम सुरु आहे. नवीन जिओ फोन सुद्धा एक फीचर फोन असणार आहे. जिओ फोन ५ ओरिजनल जिओ फोनचा एक लाइट व्हर्जन असणार आहे. म्हणजेच जिओ फोन सध्याच्या किंमतीत विकला जाणार आहे. लीक्सच्या माहितीनुसार, जिओ फोन ५ ३९९ रुपये किंमतीत लाँच केला जावू शकतो. म्हणजेच आतापर्यंत बाजारात येणारा हा सर्वात स्वस्त फोन असणार आहे. जिओचे आतापर्यंत रेकॉर्ड पाहिल्यास फीचर फोनमध्ये एलटीई कनेक्टिविटी असण्याची अपेक्षा आहे.

वाचाः

जिओ फोन ५ चे संभावित फीचर्स
४जी एलटीई सोबत जिओ ५ मध्ये KaiOS प्लॅटफॉर्म दिला जावू शकतो. म्हणजेच यात इंटरनेट ब्राऊजर सोबत काही अॅप्स आधीपासून फोनमध्ये इन्स्टॉल असतील, फोनमध्ये व्हॉट्सअॅप, गुगल, फेसबुक यासारखे अॅप्स प्री लोडेड असतील.

रिपोर्टमध्ये म्हटले की, जिओ फोन ५ चे सर्व नंबर्सवर फ्री कॉल असेल. इंटरनेटचा वापर करण्यासाठी वेगळा रिचार्ज पॅक घ्यावा लागेल. जिओ फोनसाठी सध्याच्या प्लानसाठी जिओ फोन ५ किंवा जिओ फोन लाइट युजर्संसाठी आणले जावू शकते. जिओ नवीन जिओ फोनसाठी काही स्वस्त प्लान सुद्धा लाँच करण्याची शक्यता आहे.

वाचाः

फोनची किंमत कमी ठेवण्यासाठी फोनमध्ये ओरिजनल जिओ फोन प्रमाणे एक छोटी एलसीडी डिस्प्ले आणि कीपॅड दिला जावू शकतो. जिओ फोन लाइटमध्ये वाय फाय आणि ब्लूटूथ कनेक्टिविटी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. तसेच फोनची किंमत कमी असल्याने यात कॅमेरा सुद्धा नसेल. लिमिटेड स्टोरेज असल्याने फोनमध्ये अॅप्स डाउनलोड केले जाणार नाहीत. जिओ फोन ५ च्या लाँचिंगसंदर्भात कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती दिली आहे. जिओ फोन या वर्षी किंवा पुढील वर्षी जिओ स्मार्टफोनसोबत लाँच करण्याची शक्यता आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I always spent my half an hour to read this web site’s articles or reviews daily along with a mug of coffee.

  2. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here