नवी दिल्लीः भारतात अनेक टेलिकॉम ऑपरेटर्स ऑफर करीत आहेत. या सर्विसच्या मदतीने सिम कार्ड लावल्याशिवाय युजर्स कंपनी सर्विस देते आहे. म्हणजेच युजर्संना कोणतेही सिम कार्ड शिवाय कॉलिंग, डेटा आणि मेसेजिंग पहिल्याप्रमाणे मिळू शकते. परंतु, ई सिम सर्विसच्या नावावर फ्रॉड सुरू झाले आहेत. हैदराबाद मध्ये चार लोकांचे २१ लाख रुपये अॅक्टिवेशनच्या नावावर लुटले आहेत.

वाचाः

नवीन-नवीन पद्धत अवलंबून फ्रॉड करणाऱ्या स्कॅमर सर्वात आधी मेसेज पाठवतात. KYC अपडेट करण्यासाठी डॉक्यूमेंट्स नसल्याचे सांगून पुढील २४ तासांत सिम कार्ड ब्लॉक करण्यात येत असल्याचे सांगतात. त्यानंतर युजर्संना फसवतात. मेसेज नंतर स्कॅमर कस्टमर केयर बनवून कॉल करतात. त्यानंतर फोनवर केवायसी बाकी आहे. आवश्यक डॉक्यूमेंट्स पूर्ण करण्याचा पर्याय देतात. ज्यावरून सिम कार्ड ब्लॉक केले जातात.

वाचाः

फेक फॉर्म मिळतो
युजर्संना एक मेसेज पाठवून त्यात लिंकवर क्लिक केल्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरण्यास सांगितले जाते. या दरम्यान स्कॅमर आपला ई-मेल आयडी व्हिक्टीमच्या मोबाईल नंबरसोबत रजिस्टर करतात. त्यानंतर युजर्सला ई-सिम कार्डची रिक्वेस्ट पाठवण्यास सांगतात. ही रिक्वेस्ट रजिस्टर ईमेल आयडीच्या मदतीने केली जाते. जी स्कॅमर्सची असते. ई सिम सर्विस अॅक्टिव झाल्यानंतर जनरेट होणारा क्यूआर कोड फ्रॉड करणाऱ्या ईमेलवर जातो.

स्कॅमर्सला मिळतो ओटीपी
क्यूआर कोड स्कॅन झाल्यानंतर स्कॅमरला फोन वर युजरचा नंबर अॅक्टिव होतो. युजरचा सिम कार्ड काम करणे बंद होते. फ्रॉड करणारा आधीच फॉर्ममध्ये युजर्सचा बँकिंग डिटेल्सची माहिती घेवून ठेवतो. या प्रमाणे फ्रॉड करणे सोपे जाते. बँकिंग डिटेल्सच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करण्याची प्रोसेस सुरू होते. तसेच ओटीपी सुद्धा स्कॅमरच्या त्या हँडसेटवर येतो. ज्यात ई-सिम अॅक्टिव होते. याप्रमाणे स्कॅमर्स लोकांचे बँक अकाउंड पूर्ण रिकामे करतात.

हे ध्यानात ठेवा
स्कॅमर्सची पद्धत समजून घेणे गरजेचे आहे. कोणतेही सिम ब्लॉक होण्याचा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेवू नका. स्वतः कस्टमर केयरच्या ऑफिशल नंबरवर कॉल करा. त्यानंतर केवायसी संबंधीत कोणतीही प्रोसेस फोनवर होत नाही. हे कधीच करू नका. तसेच कोणालाही आपली बँक डिटेल्स शेयर करू नका. कोणतीही टेलिकॉम कंपनी असा डेटा मागत नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here