नवी दिल्लीः भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आल्यानंतर देसी शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप्सची लाट आली आहे. सर्वात जास्त प्रसिद्ध एक अॅप म्हणजे आहे. गेल्या काही महिन्यात मोठ्या वेगाने वाढ होत आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, मित्रों अॅपने गुगल प्ले स्टोरवर ३.३ कोटी डाउनलोड्सचा आकडा पार केला आहे. डाउनलोड्सचा रेकॉर्ड बनवण्यासाठी या शॉर्ट व्हिडिओ अॅपची व्ह्यूअरशीप वाढली आहे.

वाचाः

कंपनीने सांगितले की, भारतात चायनीज अॅप वर बंदी घातल्यानंतर गेल्या महिन्यात मित्रों अॅपवर ९०० कोटी व्हिडिओज पाहिले गेले आहे. या अॅपने या महिन्याच्या सुरुवातीला २.१ कोटी डाउनलोड्सचा आकडा पार केला होता.

मित्रों अॅपचे फाउंडर आणि सीईओ शिवांक अग्रवाल यांनी या संबंधी बोलताना सांगितले की, अॅपला बनवण्या मागचा हेतू असे एक प्लॅटफॉर्म तयार करणे होता. जो युजर्संना शॉर्ट व्हिडिओ अॅप अपलोड करणे आणि त्यांना पाहण्याची सुविधा देतो. खूप कमी वेळात मित्रों अॅपने लोकप्रियता मिळवली आहे. या अॅपला हुबळी आणि लुधियाना यासारख्या छोट्या गाव आणि शहरांत खूप पसंत केले जात आहे.

वाचाः

मित्रों अॅप टिकटॉकसारखाच अॅप आहे. व्हिडिओ मेकिंग अॅप पूर्णपणे फ्री आहे. अॅपची साईज ३५ एमबी आहे. अॅपमध्ये टिकटॉक यासारखे फीचर्स मिळतात. युजर्संना वेगवेगळे बॅकग्राऊंड म्यूझिक आणि डायलॉग्स वरून क्रिएटिव व्हिडिओज बनवता येवू शकते. प्ले स्टोरवर याला ३.९ रेटिंग मिळाली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here