नवी दिल्लीः OnePlus ने आपला सर्वात स्वस्त फोन वरून पडदा हटवला आहे. वनप्लस नॉर्डला कंपनीने प्रीमियम फीचर्स सोबत मिड रेंजमध्ये उतरवले आहे. मध्ये १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इनबिल्ट स्टोरेजचे फीचर्स देण्यात आले आहे. फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. आता जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी खास संधी आहे. अॅमेझॉनवर ४ ऑगस्ट रोजी या फोनचा ओपन सेल आयोजित करण्यात आला आहे.

वाचाः

OnePlus Nord ची किंमत
वनप्लस नॉर्ड च्या ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज व्हेरियंटची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२९ जीबी स्टोरेज व्हेरियंट २७ हजार ९९९ रुपये आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. ४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ओपन सेलमध्ये केवळ ८ जीबी रॅम व १२ जीबी रॅम व्हेरियंट उपलब्ध होणार आहे. ६ जीबी रॅम व्हेरियंटला या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. तिन्ही व्हेरियंट्सला ब्लू मार्बल आणि ग्रे ऑनिक्स कलर मध्ये लाँच करण्यात येणार आहे.

वाचाः

ओपन सेल अंतर्गत कंपनी आपल्या फोनवर काही जबरदस्त ऑफर देत आहे. सर्व मोठ्या बॅंकाच्या कार्डवर ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय वर फोन खरेदी केला जावू शकतो. तसेच अमेरिकन एक्सप्रेस कार्ड वरून फोन खरेदी केल्यास २ हजार रुपयांचा कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. जिओ ग्राहकांना ६ हजार रुपयांपर्यंत फायदे देण्याची घोषणा केली आहे. रेड केबल क्लब मेंबर्ससाठी ५० जीबी क्लाउड स्टोरेज आणि ६ महिन्यांची एक्सटेंडेड वॉरंटी मिळणार आहे.

वाचाः

दोन कलरमध्ये OnePlus Nord
फोनमध्ये ६.४४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट ऑफर करतो. फोनच्या बॅकला आणि फ्रंटला कॉर्निंग गोरीला ५ ग्लासचे प्रोटेक्शन दिले आहे.

या फोनमध्ये ६ कॅमेरे
OnePlus Nord च्या बॅकला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. म्हणजेच फोनच्या मागे ४ कॅमेरे दिले आहेत. मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा Sony IMX586 सेंसर दिला आहे. तसेच फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. फोनच्या फ्रंटला २ कॅमेरे दिला आहे. फोनच्या फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड इमेज सेन्सर दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

6 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here