नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ग्राहकांना एक भेट देत १४७ रुपयांचा नवीन व्हाउचर आणला आहे. चेन्नई सर्कलमध्ये आणलेल्या या व्हाउचरमध्ये अन्य सुविधेसोबत १० जीबी डेटा दिला जात आहे. कंपनीने नवीन प्लान शिवाय काही व्हाउचर्सवर अतिरिक्त वैधता सुद्धा ऑफर केली आहे. तसेच बीएसएनएलने काही व्हाऊचर्सला बंद करीत असल्याची घोषणा केली आहे. यात पतंजली प्लानचा समावेश आहे. कंपनीने सांगितले की, युजर्सला नवीन प्लान आणि अतिरिक्त वैधतेचा फायदा १ ऑगस्ट २०२० पासून मिळणार आहे. हटवलेला प्लान ३१ जुलै पासून बंद केले आहेत.

वाचाः

१४७ रुपयांच्या प्लानमध्ये काय आहे
या प्लानमध्ये ग्राहकांना सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळते. तसेच ग्राहकांना १० जीबी डेटा दिला जातो. प्लानची वैधता ३० दिवसांची आहे. ज्यात बीएसएनएल ट्यून्सची सुविधा मिळते. सध्या हा प्लान केवळ चेन्नई सर्कलमध्ये उपलब्ध आहे.

वाचाः

या प्लान्सची वैधता वाढवली
कंपनीने सांगितले की, १ ऑगस्ट पासून ३१ ऑगस्ट या दरम्यान १९९९ रुपयांच्या प्लानला रिचार्जला ग्राहकांना ७४ दिवसांची अतिरिक्त वैधता दिली जाणार आहे. प्लान मध्ये ३६५ दिवसांची वैधता मिळते. यात ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज ३ जीबी डेटा मिळतो. अतिरिक्त वैधता मिळाल्यानंतर ग्राहक आता ४३९ दिवसांचा वापर करु शकतात. तसेच कंपनीने २४७ रुपयांच्या प्लानची वैधता ६ दिवसांनी वाढवली आहे. यात ३० दिवसांसाठी रोज ३ जीबी डेटा मिळतो.

वाचाः

कंपनीने सांगितले की, २४७ रुपयांच्या प्लानमध्ये आता इरोस नाऊ सर्विसचे अॅक्सेस दिले जाईल. याप्रमाणे ८१ दिवसांची वैधताचे ४२९ रुपयांचा प्लानसोबत इरोस नाउ सर्विसचे अॅक्सेस मिळणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here