उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे देशभरात कूलर आणि पंख्याची मागणी वाढली आहे. अनेक जण नवीन पंख्या व कूलर किंवा एसीची खरेदी करीत आहेत. जर तुम्ही तुमच्या घरासाठी सीलिंग फॅन खरेदी करायचा विचार करीत असाल तर जुन्या मॉडलच्या तुलनेत रिमोटने चालणारा पंखा खरेदी करू शकता. सध्या देशभरात रिमोटने चालणाऱ्या पंख्याची मागणी खूप वाढली आहे. अनेक जण या पंख्याची खरेदी करीत आहेत. या पंख्याला वारंवार बोर्डाकडे जावून चालू किंवा बंद करण्याची गरज पडत नाही. तुम्ही रिमोटने या पंख्याला चालू बंद करू शकता. सोफ्यावर बसून हे सर्व कामे करू शकता. अमेझॉनवरील सध्या ५ रिमोट वर चालणाऱ्या पंख्यासंबंधी माहिती देत आहोत. जाणून या पंख्याची किंमत आणि खास फीचर्स.

​LONGWAY Creta P1 1200mm Ceiling Fan ची किंमत आणि ऑफर

longway-creta-p1-1200mm-ceiling-fan-

LONGWAY Creta P1 1200mm Ceiling Fan ला ४७ टक्के डिस्काउंट नंतर १ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फॅनची किंमत ३ हजार ७८१ रुपये आहे. ईएमआय वर सुद्धा हा पंखा ९७ रुपये प्रति महिना देवून खरेदी करू शकता. बँक ऑफर मध्ये AU बँक, HDFC Bank आणि IDBI Bank कार्ड वरून पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळतो. LONGWAY Creta P1 1200mm Ceiling Fan ला रिमोटने कंट्रोल केले जावू शकते. कंपनी या पंख्यासोबत ३ वर्षाची वॉरंटी देते. या फॅनला एनर्जी सेविंगसाठी ५ स्टार दिले आहेत. एक्सचेंज ऑफर मध्ये ५०० रुपये आणखी कमी करता येवू शकतात.

​वाचाः वर्षभर Amazon Prime फ्री, नेटफ्लिक्सही मोफत, जिओच्या सर्वात स्वस्त प्लानमध्ये ५०० जीबी डेटा

​Havells Ambrose 1200mm Ceiling Fan ची किंमत आणि ऑफर​

havells-ambrose-1200mm-ceiling-fan-

Havells Ambrose 1200mm Ceiling Fan ची किंमत ५ हजार ८८० रुपये आहे. परंतु, यावर ४२ टक्के डिस्काउंट दिल्यानंतर या फॅनला ३ हजार ३९९ रुपये किंमतीत अमेझॉनवरून खरेदी करता येवू शकते. ईएमआय ऑप्शन सुद्धा यावर उपलब्ध आहे. ईएमआयसाठी फक्त १६२ रुपये महिना द्यावा लागणार आहे. बँक ऑफर मध्ये AU बँक, HDFC Bank आणि IDBI Bank कार्ड वरून पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळतो. Havells Ambrose 1200mm Ceiling Fan रिमोटने कंट्रोल होतो. कंपनी यासोबत 2+1 वर्षाची वॉरंटी देते. या फॅनला एनर्जी सेविंगसाठी ५ स्टार दिले आहे. एक्सचेंज ऑफर मध्ये ५०० रुपये मिळते.

​वाचाः मोदी सरकारने आधार कार्ड संबंधी घेतला मोठा निर्णय, निवडणुकीआधीच दिली गोड बातमी

​Atomberg Renesa 1200mm BLDC Motor 5 Star Rated Ceiling Fan ची किंमत आणि ऑफर्स​

atomberg-renesa-1200mm-bldc-motor-5-star-rated-ceiling-fan-

या फॅनची किंमत ५ हजार १९० रुपये आहे. परंतु, यावर २९ टक्के डिस्काउंट दिल्यानंतर या फॅनला ३ हजार ६८० रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. ईएमआय ऑप्शन मध्ये या पंख्याला १७६ रुपये ईएमआयवर खरेदी करता येवू शकते. बँक ऑफर मध्ये HDFC Bank आणि IDBI Bank क्रेडिट कार्ड वरून १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो. यात 28W हाय स्पीड फॅन आहे. जो रिमोट कंट्रोलवर चालतो. हा फॅन ६५ टक्के पॉवरची बचत करू शकतो, असा कंपनीचा दावा आहे.

​वाचाः BSNL-Jio-Airtel ला जबरदस्त टक्कर, Vi ने आणला पैसा वसूल प्लान, ७८ दिवसाची वैधता

​Crompton Energion Cromair ची किंमत आणि ऑफर​

crompton-energion-cromair-

Crompton Energion Cromair ची किंमत ६ हजार ५०० रुपये आहे. परंतु, यावर ४९ टक्के डिस्काउंट मिळतो. या नंतर या फॅनची किंमत ३ हजार २९९ रुपये होते. १६७ रुपये मंथली ईएमआयवर या फॅनला खरेदी करता येवू शकते. बँक ऑफर मध्ये HDFC Bank आणि IDBI Bank क्रेडिट कार्ड वरून खरेदी केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो. Crompton Energion Cromair मध्ये 28W हाय स्पीड फॅन दिला आहे. जो रिमोटने कंट्रोल करता येवू शकतो. एनर्जी सेविंगसाठी याला ५ स्टार दिले आहे. एक्सचेंज ऑफर मध्ये ३०० रुपयांपर्यंत कमी करता येवू शकते.

​वाचाः HP च्या आणखी एका स्वस्त लॅपटॉपची भारतात एन्ट्री, ११ तासांपर्यंत चालणार बॅटरी, पाहा किंमत

​Orient Electric I Tome ची किंमत आणि ऑफर​

orient-electric-i-tome-

Orient Electric I Tome ची किंमत ५ हजार २३५ रुपये आहे. परंतु, यावर ३२ टक्के डिस्काउंट नंतर ३ हजार ५५९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. १७० रुपये ईएमआय ऑप्शनवर या फॅनला खरेदी करता येवू शकते. बँक ऑफर मध्ये HDFC Bank क्रेडिट कार्ड वरून पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळू शकते. Orient Electric I Tome मध्ये 26W इंटीलेजेंट फॅन आहे. जो रिमोट कंट्रोलवर काम करतो. कंपनी या सोबत ३ वर्षाची वॉरंटी देते. एनर्जी सेविंगसाठी याला ५ स्टार दिले आहेत.

​वाचाः Jio ची आणखी ३४ शहरात पोहोचली Jio True 5G सर्विस, महाराष्ट्रातील संपूर्ण लिस्ट पाहा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

2 COMMENTS

  1. Hello there! I just would like to give you a big
    thumbs up for the great info you’ve got here on this post.

    I will be returning to your blog for more soon.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here