स्पॅम किंवा अनावश्यक ई-मेल ने तुम्ही जर त्रस्त असाल तर तुमच्यासाठी ही खास माहिती आहे. अनावश्यक ई-मेल्सने तुमचा इनबॉक्स बंद होवू शकतो. तसेच तुमचे आवश्यक काही मेल्सला सुद्धा याचा फटका बसू शकतो. यामुळे तुम्हाला तुमच्या आयडेंटिटीची किंवा चोरी तसेच फिशिंग स्कॅमचा धोका सुद्धा निर्माण होवू शकतो. सरासरी एका व्यक्तीला दररोज ४ ते ५ स्पॅम किंवा अनावश्यक ई-मेल येत असतात. त्यामुळे दररोज एका एका मेसेजला हटवणे खूप अवघड काम होते. परंतु, आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एक खास ट्रिक सांगणार आहोत. ज्यात तुम्ही या स्पॅम ईमेलला चुटकीसरशी दूर करू शकता. तुम्ही सेंडरला ब्लॉक करू शकता. किंवा त्यांची मेंबरशीप संपवू शकता. किंवा त्याला फिल्टर करू शकता. ज्या ईमेलला हटवायचे आहे, अशा सर्व स्पॅम ईमेल पाठवणाऱ्या किंवा बल्कमध्ये सर्व ईमेलला ब्लॉक करण्यासाठी या ठिकाणी काही सोप्या ट्रिक्स दिल्या आहेत. जाणून घ्या डिटेल्स.

​जीमेलवर स्पॅम ईमेलला कसं ब्लॉक कराल

​जीमेलवर स्पॅम ईमेलला कसं ब्लॉक कराल

सर्वात आधी आपले जीमेल अकाउंट ओपन करा.
आता ज्या स्पॅम मेलला ब्लॉक करायचे आहे. त्यावर क्लिक करा.
यानंतर मेलच्या वरच्या बाजुला मोर किंवा आय आयकॉन वर क्लिक करा.
सेंडरला भविष्यात तुम्हाला कोणताही ईमेल पाठवण्यापासून रोखण्यासाठी ब्लॉकवर क्लिक करा.
सेंडरला ब्लॉक केल्यानंतर त्याचे सर्व मेसेज आपोआप जीमेलच्या स्पॅम फोल्डरमध्ये जातील.
जर चुकून तुम्ही कुणाला ब्लॉक केले असेल तर तुम्ही सेंडरला कधीही अनब्लॉक करू शकता.
​वाचाः LG 1.5 Ton Split AC ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, सोबत १० वर्षाची वॉरंटी

​जीमेलवर मोठ्या ईमेलवरून अनसब्सक्राइब कसं कराल​

​जीमेलवर मोठ्या ईमेलवरून अनसब्सक्राइब कसं कराल​

सर्वात आधी जीमेल ओपन करा.
आता त्या सेंडरच्या मेलवर जा. ज्याला तुम्हाला अनसब्सक्राइब करायचे आहे.
यानंतर सेंडरच्या नावाच्या पुढे अनसब्सक्राइब किंवा चेंज प्रिफेरेंसेज ऑप्शनवर क्लिक करा.
तुम्ही मेसेजला ब्लॉक सुद्धा करू शकता. किंवा स्पॅम म्हणून सुद्धा मार्क करू शकता.
या स्टेप्सला फॉलो केल्यानंतर काही दिवसानंतर सेंडरच्या मेलची मेंबरशीप संपवली जाते.

​वाचाः Aadhaar-PAN Card Link न केल्यास होणार हे ३ नुकसान, पाहा डिटेल्स

स्पॅम ईमेलची ओळख करण्यासाठी जीमेल फिल्टर कसे कराल

स्पॅम ईमेलची ओळख करण्यासाठी जीमेल फिल्टर कसे कराल

जीमेल ओपन करा आणि सर्च बॉक्स मध्ये अनसब्सक्राइब ईमेल सर्च करा.
या सर्व स्पॅम ईमेलची निवड करा ज्यात तुम्ही प्रफोशनल ईमेलच्या लिस्टपासून सुटका होवू शकते.
टॉप मध्ये उजव्या बाजुला कॉर्नरवर उपलब्ध थ्री डॉप वर क्लिक करा. नंतर फिल्टर मेसेज लाइक धिस वर क्लिक करा.
भविष्यात स्पॅम ईमेल साठी तुम्हाला काही करायचे असेल तर त्याची निवड करा. जसे “डिलीट इट,” “मार्क एस स्पॅम,” “मार्क एस रीड” किंवा “अप्लाय लेबल.
फिल्टरला सेव्ह करण्यासाठी क्रिएट फिल्टर वर क्लिक करा आणि भविष्यात या प्रकारचे सर्व ईमेल वर असे करण्यासाठी याला पेस्ट करा.

​वाचाः ४ एप्रिलला येतोय वनप्लसचा खास स्मार्टफोन, सोबत OnePlus Nord Buds 2 येणार

​Gmail वर बल्क मध्ये ईमेल कसे डिलीट कराल​

gmail-

सर्वात आधी आपल्या ब्राउजरमधील जीमेल ओपन करा.
वरच्या उजव्या बाजुला उपलब्ध इनबॉक्स सेक्शन मध्ये सर्व मेसेजची निवड करून त्याला खालच्या बाजुवर क्लिक करा.
जर तुमच्याकडे मेसेजचे एकापेक्षा जास्त पेजेस आहेत. तर तुम्ही याला सिलेक्ट ऑल कन्वर्सेशन वर क्लिक करू शकता.
सर्व सिलेक्टेड मेसेजला थ्रॅशमध्ये घेवून जाण्यासाठी डिलीट वर क्लिक करा.

​वाचाः Vu चा धमाका, स्वस्त किंमतीतील ४३ इंच आणि ५५ इंचाचे प्रीमियम स्मार्ट भारतात लाँच

​कोणत्याही स्पेसिफिक कॅटेगरीत बल्कमध्ये मेसेजला असं हटवा​

​कोणत्याही स्पेसिफिक कॅटेगरीत बल्कमध्ये मेसेजला असं हटवा​

सर्वात आधी आपल्या ब्राउजरमधील जीमेल ओपन करा.
त्या कॅटेगरीतील पेजची निवड करा. ज्याला तुम्हाला डिलीट करायचे आहे. जसे, प्रायमरी, प्रमोशनल किंवा सोशल आदी.
सर्व निवड करण्यासाठी मेसेजच्या टॉप वरच्या डाव्या बाजुला उपलब्ध असलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करा.
सर्व निवडलेले मेसेजला थ्रॅश मध्ये घेवून जाण्यासाठी डिलिटवर क्लिक करा.

​वाचाः अदानी वीज कार्यालयातून बोलतोय, असं सांगून महिलेच्या खात्यातून ६.९ लाख लंपास

​अनरीड स्पॅम किंवा अनावश्यक ईमेलला बल्कमध्ये​

​अनरीड स्पॅम किंवा अनावश्यक ईमेलला बल्कमध्ये​

हटवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
जीमेलला कोणत्याही ब्राउजरमध्ये ओपन करा.
इनबॉक्स किंवा अन्य कॅटेगरी संबंधी ‘लेबल: यूरीड’ टाइप करा. नंतर एन्टर दाबा.
जीमेल तुमचे सर्व अनरीड ईमेल दाखवेल. तुम्ही ‘लेबल:रीड’ सर्च करून फक्त रीड मेसेजची निवड करू शकता.
आता मेसेजच्या टॉप वर ‘सिलेक्ट ऑल बॉक्स’ वर क्लिक करा. नंतर ‘सिलेक्ट ऑल कंवर्सेशन्स दॅट मॅच दिस सर्चची निवड करा.
आता तुम्हाला वरच्या डिलीट आयकॉनवर क्लिक करावे लागेल.

​वाचाः ४ एप्रिलला येतोय वनप्लसचा खास स्मार्टफोन, सोबत OnePlus Nord Buds 2 येणार

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here