वाचाः
किंमत आणि उपलब्धता
या फोनला ३४९ डॉलर म्हणजेच जवळपास २६ हजार ३०० रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. फोन केवळ ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यूएसमध्ये हा फोन प्री ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. या फोनला गुगल स्टोर आणि गुगल फाईव्ह द्वारे प्री ऑर्डर केले जावू शकते. दुसऱ्या देशात हा फोन २० ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे. हा फोन जेट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच केला आहे. भारतात हा फोन केवळ ४जी व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात येणार आहे.
वाचाः
पिक्सल 4a 5G मध्ये जास्त मोठा डिस्प्ले
कंपनीने फोनच्या ४ जी व्हेरियंटशिवाय ५जी व्हेरियंट सुद्धा लाँच केले आहे. ५जी व्हेरियंटची किंमत ४९९ डॉलर म्हणजेच जवळपास ३७ हजार रुपये किंमत आहे. फोनच्या ५जी व्हेरियंटला भारत आणि सिंगापूरमध्ये लाँच करण्यात येणार नाही.
वाचाः
गुगल पिक्सल ४ए ची खास वैशिष्ट्ये
गुगलचा हा फोन लेटेस्ट अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनमध्ये नवीन गुगल असिस्टेंट देण्यात आले आहे. गुगलच्या या फोनमध्ये ५.८१ इंचाचा फुल एचडी प्लस सपोर्ट दिला आहे. ज्याचा रिझॉल्यूशन 1080X2340 पिक्सल आहे. फोनमध्येो क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅमसोबत १२८ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. स्टोरेज वाढवता येवू शकत नाही. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS, NFC, USB Type-C, आणि 3.5mm जॅक दिला आहे. फोनच्या रियरमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. फोनमध्ये 3140mAh बॅटरी सोबत 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
Thanks so much for the blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.