6G Network: भारतात अजून सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या संपूर्ण ग्राहकांना 5G नेटवर्कची सुविधा देणे बाकी आहे. देशात सध्या फक्त दोन टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल आपल्या ग्राहकांना ​5G नेटवर्कची सुविधा देत आहे. ही सुविधा सुद्धा देशातील काही प्रमुख शहरात मिळत आहे. संपूर्ण भारतात ५जी सर्विस मिळायला अजून वेळ आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलची तर अजून ४ जी सेवा मिळत नाही. देशात ५जी नेटवर्कची चर्चा सुरू असतानाच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6G नेटवर्क साठी प्रयत्न सुरू केले आहेत. पीएम मोदी यांनी ६ जी नेटवर्क सुविधा सुरू करण्यासाठाी एक टास्क फोर्स बनवले आहे. हे लागोपाठ यावर काम करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २०३० पर्यंत भारतात 6G नेटवर्क सुरू केले जावू शकते.

जगातील या देशात ​6G साठी प्रयत्न

-6g-

जगातील अनेक देशात 6G इंटरनेट सुविधा सुरू करण्यासाठी आधीच प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. दक्षिण कोरियाने तर याची घोषणा सुद्धा केली आहे. २०२८ पर्यंत तेथील नागरिकांना ६जी सुविधा मिळू शकणार आहे. कोरियाची सरकार लोकल कंपन्यांना ६जी नेटवर्कमध्ये वापर करणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग करण्यास सांगितले आहे. ६जी नेटवर्कची घोषणा करणारा कोरिया हा पहिला देश बनला आहे. कोरियाई सरकार यावर ३ हजार ९०० कोटी रुपयेहून जास्त खर्च करणार आहे. साउथ कोरियाचे विज्ञान मंत्री लिम हेई यांच्या माहितीनुसार, ६जी नेटवर्कचा वेग देशातील उपलब्ध असलेल्या तुलनेत ५० पट जास्त असणार आहे.

​वाचाः Gmail वर आलेल्या अनावश्यक मेल्सने त्रस्त आहात?, अशी चुटकीसरशी समस्या सोडवा, पाहा सोपी ट्रिक्स

​साउथ कोरियाची मोठी भूमिका​

​साउथ कोरियाची मोठी भूमिका​

५जी विस्तारात साउथ कोरियाची मोठी भूमिका
दक्षिण कोरियाच्या सरकारने स्थानिक कंपन्यांना ६ जी नेटवर्क संबंधी सामान बनवण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी सबसिडीची घोषणा सुद्धा केली आहे. दक्षिण कोरिया सरकार याच्या संबंधी सप्लाय चेनला मजबूत करण्यावर जोर देत आहे. साउथ कोरियाच्या ५ जी विस्तारात २५.९ टक्के भागीदारी आहे. तर चीनची यात २६.८ इतकी भागीदारी आहे.

​वाचाः AC खरेदी करताना स्टार रेटिंग पाहणे का आहे आवश्यक?, ५ स्टार आणि ३ स्टारमध्ये फरक काय?

6G साठी या देशाचे प्रयत्न

6g-

६जी नेटवर्कवर कोणकोणते देश काम करीत आहेत
साउथ कोरिया शिवाय, अमेरिका, चीन, जपान आणि भारत हे सर्व ६ जी नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. अमेरिकेने यासाठी ‘नेक्स्ट जी अलायंस’ लाँच केले आहे. या अलायन्स मध्ये अॅपल, एटी अँड टी, क्वॉलकॉम, गुगल आणि सॅमसंगचा समावेश आहे. तर चीनने २०२२ च्या अखेर मध्ये आपल्या टेलिकॉम रिसर्च इंस्टिट्यूटला लिहिलेल्या श्वेतपत्र द्वारे ६ जी साठी व्हिजन जारी केले होते. यासाठी एका चिनी मोबाइल कंपनीने सुद्धा या दिशेने आपला सल्ला जारी केला होता.

​वाचाः LG 1.5 Ton Split AC ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, सोबत १० वर्षाची वॉरंटी

​जपानने बनवली रिसर्च सोसायटी​

​जपानने बनवली रिसर्च सोसायटी​

जपानमध्येही ६जी साठी व्हिजन २०२३ नावाने श्वेतपत्र प्रकाशित केले आहे. हे श्वेतपत्र जपानच्या इंटिग्रेटेड ऑप्टिकल अँड वायरलेस नेटवर्क फोरमने तयार केले होते. जपानच्या मिनिस्ट्री ऑफ इंटरनल अफेयर्स एंड कम्युनिकेशन ने यासाठी एक गव्हर्नमेंट सिव्हिलियन रिसर्च सोसायटी बनवली होती. तर साउथ कोरियाच्या मिनिस्ट्री ऑफ सायन्स, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी ने 6 जी नेटवर्कचा शोध व विकासासाठी प्लान बनवला आहे.

​वाचाः Aadhaar-PAN Card Link न केल्यास होणार हे ३ नुकसान, पाहा डिटेल्स

​6G नेटवर्कमुळे कोणते फायदे होणार​

6g-

आपल्या मोबाइलच्या इंटरनेटसाठी 5G इंटरनेट पुरेसी आहे. परंतु, जर ६जी नेटवर्क सेवा सुरू केली जात असेल तर याचा कव्हरेज एरिया १० किमी पर्यंत जाईल. यावरून स्पष्ट आहे की, नेटवर्क गायब होण्याची झंझट संपून जाईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 6G नेटवर्क सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटच्या स्पीड मध्ये ५ जीच्या तुलनेत १०० पट जास्त वाढेल. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ६ जी इंटरनेटचा वेग १०० जीबीपीएस पर्यंत जाईल. इंटरनेटचा सर्वात जास्त फायदा ऑनलाइन मीटिंग्स पासून मूव्ही एक्सपीरियन्स पर्यंत स्पष्ट पणे दिसेल.

​वाचाः ४ एप्रिलला येतोय वनप्लसचा खास स्मार्टफोन, सोबत OnePlus Nord Buds 2 येणार

​चित्रपट डाउनलोडसाठी फक्त १ सेकंद लागेल​

​चित्रपट डाउनलोडसाठी फक्त १ सेकंद लागेल​

जर ६ जी नेटवर्क सेवा सुरू झाली तर आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि मशीन लर्निंग आताच्या तुलनेत आणखी शानदार होईल. प्रत्येक काम एआय आणि मशीन लर्निंगच्या मदतीने होईल. यासाठी सध्या व्यक्तीला जी नजर ठेवावी लागते. याची गरज पडणार नाही. सामान्य आयुष्यात एक 4K मूव्ही डाउनलोड करण्यासाठी फक्त १ सेकंद लागेल. तसेच विजेची बचता आणि वेळेची बचत होईल. कारखान्यात मशीन आणि रोबोटमुळे उर्जा व पाण्याची बचत होईल.

​वाचाः Vu चा धमाका, स्वस्त किंमतीतील ४३ इंच आणि ५५ इंचाचे प्रीमियम स्मार्ट भारतात लाँच

​कृषि क्षेत्रात कसे मदत करणार ६जी नेटवर्क​

​कृषि क्षेत्रात कसे मदत करणार ६जी नेटवर्क​

६जी इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर कृषि क्षेत्राला मोठा फायदा मिळणार आहे. स्मार्ट फार्मिंगच्या मदतीने पिकांवर योग्य प्रमाणात कीटकनाशकाचा वापर केला जाईल. तसेच पाण्याची बचत सुद्धा होवू शकते. सोबत सर्व गोष्टींवर स्मार्ट पद्धतीने वॉच ठेवली जावू शकते. ड्रायवरलेस व्हीकलला ऑपरेट करण्यात सहज मदत मिळणार आहे. स्मार्टफोन शिवाय, लोक ब्रेन कंप्यूटर्सचा वापर सुरू करतील. यासोबत चिपला व्यक्तीच्या शरीरात बसवून सायबॉर्गचचा वापर करतील.

​वाचाः अदानी वीज कार्यालयातून बोलतोय, असं सांगून महिलेच्या खात्यातून ६.९ लाख लंपास

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here