नवी दिल्लीः Vivo ने आपला एस सीरीजचा लेटेस्ट स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला आहे. विवो एस७ मध्ये ड्यूल सेल्फी कॅमेरा, ६४ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड स्क्रीन यासारखे खास फीचर्स देण्यात आले आहेत. विवोचा हा फोन इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येतो.

वाचाः

Vivo S7 ची किंमत
एस७ च्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेजच्या व्हेरियंटची किंमत २७९८ चीनी युआन म्हणजेच जवळपास ३० हजार रुपये किंमत आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३०९८ चीनी युआन म्हणजेच ३३ हजार ३८० रुपये किंमत आहे. फोन चीनमध्ये प्री बुकिंग साठी उपलब्ध आहे. या फोनची विक्री ८ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.

वाचाः

Vivo S7 ची वैशिष्ट्ये
विवोच्या या फोनमध्ये ६.४४ इंचाचा (1080 x 2400 pixels) फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 765G प्रोसेसर आणि ग्राफिक्स साठी अड्रेनो 620GPU दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी तसेच २५६ जीबी इनबिल्ट स्टोरेज असे दोन पर्याय दिले आहेत. हँडसेट अँड्रॉयड १० बेस्ड फनटच ओएस १०.५ वर चालतो. फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट मिळतो. फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

वाचाः

या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा रियर सोबत ८ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा मोनो सेन्सर दिला आहे. फोनमध्ये ४४ मेगापिक्सलचा ऑटो फोकस सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगलचा ड्यूल सेल्फी कॅमेरा सेटअप दिला आहे. फोन ६० फ्रेम प्रति सेकंडवर ४के सपोर्ट करतो. विवोच्या या हँडसेटमध्ये 5जी, ड्यूल 4जी वीओएलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, जीपीएस/ग्लोनास, एनएफसी, यूएसबी टाइप-सी यासारखे फीचर्स दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here