तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करायचा विचार करीत असाल तर सर्वात आधी डोक्यात विचार येतो तो म्हणजे फोन ५जी असायला हवा. परंतु, ५जी फोनच्या नावाने कोणताही फोन खरेदी करणे योग्य नाही. आज बाजारात बजेट सेगमेंट मध्ये ५जी फोन आले आहेत. परंतु, त्यात बेस्ट ५जी फोन कोणता आहे, असा प्रश्न उपस्थित राहतो. अनेक जण बेस्ट 5G फोन असल्याचा दावा करीत आहेत. परंतु, त्यात खरा 5G फोन कोणता आहे. असा प्रश्न पडतो. तुम्हाला जर ५जी फोन संबंधी जाणून घ्यायचे असेल तर या ठिकाणी १० पॉइंट्स देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

सर्वात जास्त ५जी बँड सपोर्ट
प्रोसेसर फॅब्रिकेशन
हीट डिस्पेशन सिस्टम
UFS मेमरी
कमीत कमी 8GB रॅम
मोठी बॅटरी
हाय रिझॉल्यूशन स्क्रीन
90 किंवाा 120 हर्ट्ज़ रिफ्रेश रेट
फास्ट चार्जिंग
डॉल्बी इंटीग्रेशन

​जास्तीत जास्त ५जी बँड सपोर्ट

​जास्तीत जास्त ५जी बँड सपोर्ट

भारतात 5G सर्विससाठी सध्या जिओ आणि एअरटेलने घोषणा केली आहे. जिओ आणि एअरटेलची ५जी सर्विस काही शहरात सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एअरटेलकडे ५जी सर्विससाठी 900 MHz (n8), 1800 MHz (n3), 2100 MHz (n1), 3300 MHz (n78) आणि 26 GHz (n258) बँड आहे. तर कंपनी ५ जी सर्विससाठी एन८ आणि एन ३ बँडचा उपयोग करीत आहे. तर Jio 5G bands कंपनीकडे 700 MHz (n28), 3300 MHz (n78) शिवाय, 26 GHz (n58) बँड आहे. कंपनी एन २८ आणि एन ७८ बँडचा वापर करीत आहे.

​वाचाः Airtel 5G : जे जिओला जमलं नाही ते एअरटेलनं करून दाखवलं

​प्रोसेसर फॅब्रिकेशन

​प्रोसेसर फॅब्रिकेशन

आतापर्यंत तुम्हाला सांगितले जाते की, तुम्ही कोणत्या फोनची निवड करता त्यावर प्रोसेसर आणि स्पीड जास्त मिळते. परंतु, फोनची निवड अशी करा ज्याचा प्रोसेसर फॅब्रिकेशन जास्त आहे. आज बाजारात ४ नॅनोमीटर फॅब्रिकेशन प्रोसेसर वर तयार प्रोसेसर सोबत फोन येत आहेत. तुम्हाला जर फोनची निवड करायची असेल तर कमीत ७ नॅनोमीटर फॅब्रिकेशनचा फोन खरेदी करा. या ५ जी फोनमध्ये बऱ्यापैकी स्पीड मिळते.

​वाचाः PAN Aadhaar Linking Status : पॅन-आधार कार्ड लिंकची डेडलाइन, घरी बसून ‘असं’ चेक करा स्टेट्स

​हिट डिस्पेशन सिस्टम​

​हिट डिस्पेशन सिस्टम​

तुम्ही ५जी फोन खरेदी करायचा प्लान करीत असाल तर त्यावर इंटरनेट ब्राउजिंग सोबत ऑनलाइन गेमिंग आणि हेवी अॅप्सचा वापर कराल. त्यामुळे तुमच्या फोनमध्ये हीट डिस्पेशन आणि वेपर कूलिंग चेंबर सारखे फीचर्स असायला हवेत. यामुळे इंटरनेटचा वापर ऑनलाइन गेमिंग दरम्यान प्रोसेसर गरम होतो. हीट डिस्पेशन आणि वेपर कूलिंग चेंबर सारखे फीचर्स तापमानाला मेंटेंन ठेवते व फोनचा परफॉर्मन्स कायम ठेवतात.

​वाचाः ठरलं! Nothing Phone (2) लवकरच भारतात लाँच होणार, पाहा संभावित फीचर्स

​UFS मेमरी

ufs-

फोनमध्ये फास्ट डेटा ट्रान्सफर करण्यासाठी जितकी गरजेचे प्रोसेसर आणि रॅम टेक्नोलॉजी आवश्यक आहे. तितकेच आवश्यक फ्लॅश मेमरी किंवा इंटरनल मेमरी टेक्नोलॉजी आवश्यक आहे. जर तुमच्या मेमरी मध्ये यूएफएस सपोर्ट असेल तर आणखी उत्तम. बाजारात ४.० यूएपएसचे फोन आहेत. परंतु, जर तुम्ही ३.० किंवा ३.१ यूएफएस फोन खरेदी करीत असाल तर तुमच्यासाठी ते चांगले आहे.

​वाचाः Airtel च्या एका रिचार्जमध्ये मिळणार संपूर्ण फॅमिलीला बेनिफिट्स, १९० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

रॅम आणि बॅटरी

रॅम आणि बॅटरी

८ जीबी रॅम
तुमचा ५जी फोन कमीत कमी ८ जीबी रॅमचा असायला हवा. कारण, ५जी फोनमध्ये फास्ट नेटवर्क स्पीडला प्रोसेस करण्यासाठी जास्त मेमरीचा उपयोग होतो. त्यमुले ४जी आणि ६ जीबी सोबत समस्या येवू शकते. त्यामुळे ५जी फोन कमीत कमी ८ जीबी रॅमचा असायला हवा.

मोठी बॅटरी

५जी फोन मध्ये बॅटरी वेगाने कमी होते. ४५०० एमएएच क्षमते पेक्षा जास्त बॅटरी असायला हवी. ५००० एमएएच किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर उत्तम आहे.

​वाचाः PAN Aadhaar Linking Status : पॅन-आधार कार्ड लिंकची डेडलाइन, घरी बसून ‘असं’ चेक करा स्टेट्स

​फास्ट चार्जिंग​

​फास्ट चार्जिंग​

९० किंवा १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट
जर तुम्ही ५जी फोन खरेदी करीत असाल तर तुम्ही कमीत कमी ९० हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेटचा फोन खरेदी करा. उलट १२० किंवा १४४ हर्ट्जचा रिफ्रेश रेट असेल तर आणखी उत्तम. फास्ट स्क्रॉलिंग तुम्हाला अडथला निर्माण करणार नाही.

फास्ट चार्जिंग
फोनमध्ये फास्ट चार्जिंग असणे सुद्धा गरजेचे आहे. ५जी फोनमध्ये बॅटरी वेगाने संपत असते. इंटरनेट चालवणे किंवा ऑनलाइन गेमिंग मध्ये बॅटरी कधी कमी होते कळत नाही. त्यामुळे फोनमध्ये फास्ट चार्जिंग आवश्यक आहे. ४४ वॉट किंवा त्यापेक्षा जास्त फास्ट चार्जिंग असेल तर चांगले आहे.

डॉल्बी इंटिग्रेशन
डॉल्बी खास करून साउंड टेक्नोलॉजीसाठी ओळखले जाते. जर ५जी फोन खरेदी करीत असाल तर मोठी डिस्प्ले आणि सुपर फास्ट इंटरनेट सोबत साउंट टेक्नोलॉजीवर लक्ष द्यायला हवे. फोनचा इंटरनेट मेंट किंवा ओटीटी आणि गेमिंगसाठी डॉल्बी इंटिग्रेशन आवश्यक आहे.

​वाचाः Airtel च्या एका रिचार्जमध्ये मिळणार संपूर्ण फॅमिलीला बेनिफिट्स, १९० जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here