नवी दिल्लीः शाओमीने गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चीनमध्ये रेडमी ९ ए स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने या रेडमी स्मार्टफोनला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंट मध्ये लाँच केले होते. शाओमीने आता आपल्या या एन्ट्री लेवल स्मार्टफोन चे नवीन व्हेरियंट लाँच केले आहे. शाओमीचा हा फोन २ जीबी रॅम प्लस ३२ जीबीच्या इंटरनल स्टोरेजसोबत येतो. शाओमीच्या या फोनमध्ये नवीन व्हेरियंट खूप स्वस्त किंमतीत आणले आहे.

वाचाः

६ हजारांपेक्षा कमी किंमत
शाओमी Redmi 9A च्या २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटची चीनमध्ये किंमत ४९९ युआन म्हणजेच जवळपास ५ हजार ३०० रुपये आहे. रेडमीच्या या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच सोबत ६.५३ इंचाचा IPS LCD डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 720 x 1600 पिक्सल आणि ऑस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोनमध्ये फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा सेल्फी दिला आहे. हा कॅमेरा एचडीआर आणि जेस्चर फोटो यासारखे फीचर्स देण्यात आले आहे.

वाचाः

फोनमध्ये 5,000mAh बॅटरी
फोनच्या बॅकला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा कॅमेरा युजर्संना HDR, पोर्ट्रेट मोड, AI सीन रिकॉग्निशन, टाइम-लॅप्स फोटोग्राफी यासारखे फीचर्स दिले आहेत. शाओमीचा हा एन्ट्री लेवल स्मार्टफोन Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी दिली आहे. १० वॉट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड MIUI 12 सोबत येतो. या फोनमध्ये दोन सिम कार्ड येतात.

वाचाः

शाओमी रेडमी ९ ए स्मार्टफोनमध्ये ड्यूल स्पीकर्स, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, माइक्रोयूएसबी आणि 3.5mm ऑडियो जॅक देण्यातआला आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट रीडर देण्यात आला नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here