Twitter Blocked Pakistan Government: एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरची (Twitter News) मालकी स्विकारल्यापासूनच या-ना त्या कारणानं ट्विटर नेहमीच चर्चेत असतं. ट्विटरनं आपल्या पॉलिसीमध्ये अनेक फेरबदल केले आहेत. अशातच आता ट्विटरनं मोठी कारवाई करत पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल (Pakistan Government Twitter Handle) भारतात ब्लॉक केलं आहे. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटिसीनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल भारतात ब्लॉक करण्यात आलं आहे. 

ट्विटरच्या (Twitter Guidelines) गाईडलाईन्सनुसार, न्यायालयाचा आदेश किंवा सरकारी मागणी यांसारख्या वैध कायदेशीर मागणीवर ट्विटर हँडल ब्लॉक करावं लागतं. 

इतर देशांमध्ये अकाउंट सुरू राहणार 

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल अमेरिका, कॅनडा इत्यादी देशांमध्ये सक्रिय आहे. या प्रकरणी भारत किंवा पाकिस्तानच्या माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर गेल्यानंतर तिथे लिहिलंय की, “भारतातील एका कायदेशीर मागणीला प्रतिसाद म्हणून पाकिस्तान सरकारचं भारतातील ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आलं आहे.”

news reels Reels

पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर तिसऱ्यांदा कारवाई 

एएनआयच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचं ट्विटर अकाउंटवर भारतात  बंदी घालण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी जुलै 2022 मध्ये, पाकिस्तान सरकारच्या ट्विटर हँडलवर भारतात बंदी घालण्यात आली होती. परंतु नंतर ती बंदी हटवण्यात आली आणि अकाउंट भारतात पुन्हा दिसू लागलं. आता पुन्हा ट्विटरनं भारतात पाकिस्तान सरकारचं ट्विटर हँडल ब्लॉक केलं आहे. 

गेल्या वर्षी जूनमध्ये ट्विटर इंडियानं भारतातील संयुक्त राष्ट्र, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावासांची अधिकृत ट्विटर अकाउंट ब्लॉक केली होती. यासोबतच भारतानं भारतविरोधी खोटी माहिती पसरवणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनल आणि फेसबुक अकाउंटवर बंदी घातली होती.

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here