Poco F5
पोको या महिन्यात भारतात Poco F5 आणि Poco F5 प्रो 5G ला लाँच करू शकतो. बेस मॉडल मध्ये तुम्हाला ६.६७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले मिळेल. जो 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. मोबाइल फोनमध्ये 5000 एमएचची बॅटरी ६७ वॉटच्या फास्ट चार्जिंग सोबत मिळू शकतो. ही माहिती योगेश बरार ने ट्विटर अकाउंट द्वारे शेअर केली आहे.
OnePlus Nord CE 3 Lite

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लस ४ एप्रिल रोजी आपला एक बजेट फोन OnePlus Nord CE 3 Lite ला बाजारात लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि ६७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे. या फोनची किंमत २२ हजार रुपयाच्या जवळपास असू शकते. परंतु, ही माहिती अजून अधिकृत पणे दिली नाही.
वाचाः गुगलवर चुकूनही सर्च करू नका या ५ गोष्टी, १० लाखाच्या दंडासोबत जेलची हवा खावी लागेल
Asus ROG Phone 7

Asus भारताता १३ एप्रिल रोजी दोन स्मार्टफोन Asus ROG Phone 7 आणि Asus ROG Phone 7 अल्टीमेटला लाँच करण्याची शक्यता आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन ८ जनरेशन २ चिपसेटचा सपोर्ट मिळेल. फोनमध्ये ६.७८ इंचाचा स्क्रीन आणि 6000mah ची बॅटरी सोबत ६५ वॉटची चार्जिंग सपोर्ट मिळेल.
वाचाः आजपासून ट्विटरमध्ये Twitter Blue Tick सह हे पाच बदल, पाहा डिटेल्स
Vivo X90 Series

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी विवो या महिन्यात Vivo X90 सीरीज भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये आधीच लाँच करण्यात आलेला आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी ३ मोबाइल फोन, विवो X90, विवो X90 Pro आणि विवो X90 Pro ला लाँच करणार आहे. काही फेमस टिप्सटरने या सीरीजला भारतात मार्च महिन्यात लाँच केले जाईल, असा दावा केला होता. परंतु, कंपनीने अजूनही अधिकृतपणे याची घोषणा केली नाही.
वाचाः OnePlus 10R 5G च्या किंमतीत दुसऱ्यांदा कपात, फोन ७ हजारांनी स्वस्त, पाहा नवी किंमत
VIVO V27e

विवो कंपनी या महिन्याच्या अखेर पर्यंत भारतात एक बजेट स्मार्टफोन VIVO V27e ला लाँच करू शकतो. यात तुम्हाला मीडियाटेक हीलियो G99 चिपसेट पाहायला मिळू शकते. ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आलेल्या VIVO V27e मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप, ६७ वॉटची फास्ट चार्जिंग आणि अनेक खास फीचर्स या फोनमध्ये मिळू शकते.
वाचाः Mi 32 Inch Smart TV मिळतोय अर्ध्या किंमतीत, अशी ऑफर पुन्हा नाही
Realme GT Neo 5 SE

रियलमी या महिन्यात Realme GT Neo 5 SE स्मार्टफोनला लाँच करू शकते. मोबाइल फोनमध्ये तुम्हाला ६.७४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले 144hz च्या रिफ्रेश रेट सोबत मिळू शकतो. या फोनमध्ये ५५०० एमएएच क्षमतेची बॅटरी, स्नॅपड्रॅगन ७ प्लस जनरेशन २ एसओसीचा सपोर्ट, ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि १०० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकते. ही सर्व माहिती लीक रिपोर्ट्सवर आधारित आहे. मोबाइल फोन्सवरून अजूनपर्यंत खूपच कमी घोषणा करण्यात आली आहे.
वाचाः आजपासून ट्विटरमध्ये Twitter Blue Tick सह हे पाच बदल, पाहा डिटेल्स
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
See Amazin News Website Daily Worldwide [url=https://sepornews.xyz]Sepor News[/url]
This is a very good tip especially to those fresh to the blogosphere.
Short but very accurate information… Appreciate your sharing this one.
A must read article!
Look At Amazin News Website Daily Worldwide [url=https://sepornews.xyz]Best News Website[/url]