स्मार्टफोनसाठी भारतीय मार्केट आता खूप मोठे झाले आहे. देशातील तसेच विदेशातील जवळपास सर्वच्या सर्व कंपन्या भारतात स्मार्टफोन लाँच करीत असतात. या फोनमध्ये बजेट फोनपासून फ्लॅगशीप आणि प्रीमियम स्मार्टफोन्सचा समावेश असतो. फोनची फीचर्स पाहत असताना आपण नेहमी स्मार्टफोनमध्ये स्क्रीन, प्रोसेसर आणि रॅम सोबत IP रेटिंग्स पाहत असतो. काही फोन IP52 रेटिंग सोबत येतात तर काही फोन IP67 रेटिंग सोबत येतात. अनेक फोन अडवॉन्स्ड IP68 रेटिंग सोबत येतात. पण ही आयपी रेटिंग नेमकी आहे तरी काय?, याची पुरेसी माहिती स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला नसते. या रेटिंग्सचा काय फायदा होतो. वेगवेगळी आयपी रेटिंग्सचा अर्थ काय आहे. यासंबंधी या आर्टिकलमधून जाणून घेऊयात. तसेच कोणती रेटिंग किती फायद्याची आहे. हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला फोन खरेदी करताना नक्कीच फायदा मिळेल.

​काय असते IP रेटिंग​

-ip-

IP Code म्हणजे इनग्रेस प्रोटेक्शन रेटिंग जी अनेक इंटरनॅशनल प्रोटेक्शन रेटिंगच्या नावाने ओळखली जाते. Ingress Protection Rating किंवा International Protection Rating या दोन वेगवेगळ्या नावाने ही रेटिंग फोनमध्ये दिली जाते. यात दोन अल्फाबेट नंतर दोन न्यूमेरिकल अंक असतात. जे डिव्हाइसच्या सुरक्षेचे स्टँडर्ड सांगत असतात. IP रेटिंगला IEC म्हणजेच International Electrotechnical Commission द्वारा परिभाषित करण्यात आले आहे. ही रेटिंग वस्तूला म्हणजेच हात, बोटे, शरीराच्या अंगासह धूळ, आकस्मिक संपर्क आणि वीज तसेच पाण्यापासून सुरक्षित राहावे यासाठी सुरक्षित ठेवते.

​वाचाः गुगलवर चुकूनही सर्च करू नका या ५ गोष्टी, १० लाखाच्या दंडासोबत जेलची हवा खावी लागेल

काय असते IP रेटिंग

-ip-

हे आहे आयपी संबंधी. आता यात दिल्या जाणाऱ्या आकड्यासंबंधी जाणून घ्या. खरं म्हणजे IEC कंपन्यांकडून डिव्हाइसला धूळ आणि पाणी अवरोध करण्यापासून दाव्याला रेटिंगमध्ये डिफाइन करते. त्याला १० पैकी किती गुण मिळते. या IP नंतर ५२, ६७ किंवा ६८ अंकाचा उपयोग केला जातो. यात पहिला अंक जो असतो. तो डिव्हाइसच्या धुळीची अवरोधक क्षमता दाखवतो. दुसरा अंक असतो. तो पाण्याची अवरोध क्षमता दाखवतो. उदाहर्णार्थ आपण IP67 चं उदाहरण घेतले तर यातील ६ अंक हा धुल अवरोध क्षमतेसाठी IEC कडून १० पैकी ६ अंक दिले आहे.

​वाचाः आजपासून ट्विटरमध्ये Twitter Blue Tick सह हे पाच बदल, पाहा डिटेल्स

काय असते IP रेटिंग

-ip-

तर दुसरा अंक ७ हा IEC कडून पाणी अवरोध क्षमतेसाठी १० पैकी दिला आहे. अनेकदा आपण आपले असेल की, IP नंतर X लिहिले असते. यानंतर कोणताही अंक असतो. आता हे नेमके काय आहे. उदाहर्णार्थ IPX7 चे उदाहरण घ्या. या डिव्हाइस पाणी अवरोधक आहे. परंतु, धुळ अवरोधक नाही. या ठिकाणी एक्सचा अर्थ शून्य अंक आहे. जर तुमच्या फोनमध्ये IP6X असेल तर याचा अर्थ तुमचा फोन फक्त धुळीपासून बचाव करू शकतो. पाण्यापासून नाही. तसेच काही फोनला ५, ६ किंवा ७ अंक दिले जाते.

​वाचाः OnePlus 10R 5G च्या किंमतीत दुसऱ्यांदा कपात, फोन ७ हजारांनी स्वस्त, पाहा नवी किंमत

​IP52, IP67 आणि IP68

ip52-ip67-ip68

या ठिकाणी IP सोबत जितके मोठे आकडे असतील त्याचा अर्थ तो फोन तितका सक्षम आहे. सर्वात पहिल्या अंक म्हणजेच डस्ट किंवा धुळ रेटिंग संबंधी माहिती देत आहे. अनेक फोन मध्ये तुम्ही पाहिले असेल की, ते IP52 रेटिंग सोबत येते. अनेक वेळा IP67 सोबत येतो. या ठिकाणी IP नंतर पहिल्या अंकात ५ आणि ६ मध्ये फरक आहे. IP5 हा फोन मर्यादित धुळ पासून बचाव करण्यात सक्षम आहे. जास्त धुळ लागल्यास हा फोन खराब होवू शकतो. तर IP6 नंबर फोनमध्ये असेल तर धुळीपासून पूर्णपणे सुरक्षित आहे. फोन धुळीने खराब होणार नाही. भारतात बनवलेले जास्तीत जास्त फोन हे ६ रेटिंग प्राप्त आहेत.

​वाचाः Mi 32 Inch Smart TV मिळतोय अर्ध्या किंमतीत, अशी ऑफर पुन्हा नाही

IP52, IP67 आणि IP68

ip52-ip67-ip68

आज आम्ही या ठिकाणी IP52, IP67 आणि IP68 या तिन्हीची उदाहरण सांगत आहोत. जर तुमच्या फोनला IP52 ची रेटिंग मिळाली असेल तर याचा अर्थ आहे. धुळीच्या सोबत छोटे छोटे पाण्याच्या थेंबापासून फोनला काहीच होणार नाही. यात पाण्याची रेटिंग २ दिली आहे. जी खूपच कमी आहे. थोडे पाण्याची थेंब पडली तर फोनला काही होणार नाही. परंतु, फोन वर जास्त पाणी पडल्यास फोन खराब होवू शकतो.
याच प्रमाणे तुमचा फोन IP67 रेटिंगचा असेल तर धुळ आणि पाण्यापासून पूर्णपणे सुरक्षित आहे.

​वाचाः आजपासून ट्विटरमध्ये Twitter Blue Tick सह हे पाच बदल, पाहा डिटेल्स

IP52, IP67 आणि IP68

ip52-ip67-ip68

म्हणजेच फोन एक मीटर पाण्यात ३० मिनिट पर्यंत ठेवला तरी त्याला काहीच होणार नाही. परंतु, जास्त प्रेशरमध्ये गेल्यास फोन खराब होवू शकतो. या ठिकाणी पाण्याची रेटिंग ७ आहे. जी सरासरी चांगली आहे. आता IP68 संबंधी जाणून घेऊयात. यात धुळीची क्षमता आहे. म्हणजेच धुळीपासून फोन पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु, ८ रेटिंग दिली असल्याने पाण्याची क्षमता आणखी वाढते. IP68 रेटिंग प्राप्त फोन दीड मीटर पाण्यात ३० मिनिट पर्यंत राहू शकतो.

​वाचाः iPhone 14 ला अर्ध्या किंमतीत खरेदीची संधी, ४५ हजारांची बंपर सूट

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here