नवी दिल्लीः Lava ने मंगळवारी आपला नवीन हँडसेट देशात लाँच केला आहे. स्मार्टफोन निर्माताने ला कंपनीने स्मार्टफोन मार्केटमध्ये १० हजार रुपयांपेक्षा कमी सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. लावाच्या या हँडसेटमध्ये 3950mAh आणि ६.०८ इंचाचा डिस्प्ले असे खास फीचर देण्यात आले आहेत. फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाईल नॉच पुढच्या बाजुला दिला आहे.

वाचाः

Lava Z66 ची किंमत
लावा झेड ६६ ची किंमत ७७७७ रुपये आहे. हा फोन मरीन ब्लू, बेरी रेड आणि मिड नाईट ब्लू या रंगात उपलब्ध आहे. मेन इन इंडिया स्मार्टफोन सध्या ऑफलाइन रिटेल स्टोर्सवरून खरेदी करता येवू शकतो. या फोनला लवकरच ई-कॉमर्स साईट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करता येवू शकेल, असे कंपनीने सांगितले.

वाचाः

Lava Z66 ची वैशिष्ट्ये
लावा झेड ६६ ड्यूल सिम सपोर्ट करतो. यात २.५ डी कर्व्ड ६.०८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये एक नॉच कट आउट आहे. ज्यात सेल्फी कॅमेरा दिला आहे. हँडसेटमध्ये 1.6 गीगहर्ट्ज़ ऑक्टा-कोर प्रोसेसर, 3 जीबी रॅम व 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. स्टोरेजला १२८ जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येवू शकते. लावाच्या या फोनला पॉवर देण्यासाठी 3950mAh बॅटरी दिली आहे. १६ तासांपर्यंत टॉक टाईम सिंगल चार्जवर मिळेल, असा कंपनीचा दावा आहे. लावाचा हा फोन स्टॉक अँड्रॉयड १० वर चालतो. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक यासारखे फीचर्स दिले आहेत.

वाचाः

फोटोग्राफीसाठी लावच्या या फोनमध्ये ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. लावाच्या या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत १३ मेगापिक्सलचा आणि ५ मेगापिक्सलचे दोन कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. रियर कॅमेरा ब्यूटी मोड, नाइट मोड, एचडीआर मोड, बर्स्ट मोड, पॅनोरमा, टाइम-लॅप्स आणि स्लो-मोशन मोड्स सपोर्ट करतात. या फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट करतो. यात कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 4.2, OTG सपॉर्ट आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here