माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या जमान्यात सोशल मीडियावरुन खोट्या बातम्या आणि फॉरवर्ड्सचा अक्षरशः पाऊस पडत असतो. त्याला आळा घालणं अद्याप शक्य झालं नसल्यानं, खोट्या बातम्यांचं किंवा खोट्या फॉरवर्ड्सचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येतंय. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, करोना संसर्ग, करोनावरील लस त्याचबरोबर इतर औषधं याबद्दल बऱ्याच खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अशा ”ना आळा घालण्यासाठी ”च्या विद्यार्थ्यांनी एक तयार केली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून खोट्या बातम्यांना अटकाव करणं शक्य होणार आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून, ती बातमी खरी आहे की खोटी आहे त्याविषयी माहिती समजणार आहे.
कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी, तो खरा आहे की खोटा, याची शहानिशा करणं गरजेचं असतं. पण, सहसा तेवढी तसदी कोणी घेत नाही. त्यामुळे ही वेबसाइट महत्त्वाची ठरणार आहे. सोमय्या कॉलेजचे विद्यार्थी सुमित मांजरेकर, समीक्षा भाटिया, पिनक जानी आणि काव्या मूल्या यांच्या टीमनं हे टूल तयार केलंय. या प्रोजेक्टकरीता विद्यार्थ्यांच्या टीमला ‘आयआयटी मुंबई’च्या ‘ई-यंत्रा हॅकेथॉन’ या स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालंय.
कसं काम करतं हे टूल?
या विद्यार्थ्यांनी एक वेबसाइट तयार केली आहे. ही वेबसाइट ‘डीप लर्निंग’ तंत्रज्ञानावर काम करते. ज्या माहितीची सत्यता आपल्याला तपासायची आहे, ती माहिती या वेबसाइटवर टाकू शकतो. माहिती टाकल्यानंतर लगेच आपल्याला ही बातमी किंवा माहिती खरी आहे की खोटी आहे, हे त्या वेबसाइटवर दर्शवलं जाणार आहे. गोपनीयतेशी कोणतीही तडजोड न करता, बनावट बातम्यांचा शोध या वेबसाइटच्या माध्यमातून घेतला जाईल. सध्या हे टूल फक्त इंग्रजी भाषेतील मजकूराबद्दल माहिती देईल. पण, भविष्यात प्रादेशिक भाषांचा समावेश यामध्ये करण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्यांनी हा प्रोजेक्ट प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला आहे. येत्या १५ ऑगस्टपासून सर्वसामान्य लोकांनासुद्धा ‘कोविड-१९’बद्दलच्या बातम्यांमधील खरे-खोटेपणा तपासून पाहण्यासाठी हे टूल उपलब्ध होणार आहे. या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वेबसाइटला ट्रेन करण्याकरीता आणि डीप लर्निंग तंत्रज्ञानाकरीता खूप डेटा, म्हणजेच माहितीची आवश्यकता होती. ती माहिती सहजासहजी उपलब्ध नव्हती. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी विविध वेबसाइट्स आणि सोशल मीडिया फॉरवर्ड्स याबद्दलची माहिती एकत्र केली. ही माहिती एकत्र करण्याचं मोठं आव्हान हा प्रोजेक्ट करताना विद्यार्थ्यांसमोर होतं. त्याचबरोबर जमा केलेल्या माहितीची, खरी आणि खोटी माहिती असं विश्लेषण किंवा लेबलिंग करणं हे कामसुद्धा किचकट होतं, असं या विद्यार्थ्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या वेबसाइटवर सध्या फक्त करोनाबद्दलच्या बातम्यांची सत्यता तपासता येते. भविष्यात हे विद्यार्थी करोनाबरोबरच इतर बातम्यांची सत्यता तपासणीची सुविधासुद्धा या वेबसाइटवर उपलब्ध करून देणार आहेत.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
Your site is very helpful. Many thanks for sharing!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
Thanks so much for the blog post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.