नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने गेल्या आठवड्यात आपला नवीन भारतात लाँच केला आहे. हा सॅमसंगच्या गॅलेक्सी M31 चे अपग्रेड मॉडल आहे. याचा सेल ६ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. कंपनीने या सीरीजच्या आणखी एक स्मार्टफोन Galaxy M51 वर कंपनी खूप आधीपासून काम करीत आहे. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh बॅटरी देण्याची शक्यता आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम५१ च्या कॅमेरा आणि बॅटरी संबंधी काही रिपोर्ट्स याआधी समोर आले आहेत.

वाचाः

आता ताज्या रिपोर्ट्समधून ही माहिती समोर आली आहे की, या फोनमध्ये बॅटरी २५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत येणार आहे. ही माहिती FCC सर्टिफिकेशन समोर आली आहे. हा सुद्धा एम सीरीजच्या स्मार्टफोन प्रमाणे सॅमसंगचा बजेट फोन असणार आहे. जो कंपनीच्या गॅलेक्सी ए५१ स्मार्टफोनचा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असणार आहे. जो नॉन सॅमसंग डिस्प्ले ओलेड पॅनेलसोबत येईल. तसेच 7,000mAh बॅटरीचा हा पहिला सॅमसंग स्मार्टफोन असणार आहे. SamMobile च्या रिपोर्टच्या माहितीनुसार, या ड्यूल सिम स्मार्टफोनमध्ये NFC आणि ड्यूल बँड WiFi सपोर्ट मिळणार आहे.

वाचाः

फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा
सॅमसंग गॅलेक्सी एम५१ मध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. ६४ मेगापिक्सलच्या सेन्सरसोबत एक १२ मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर सुद्धा मिळणार आहे. फोनमध्ये एकूण ४ रियर कॅमेरे मिळू शकतात. तसेच या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबीचे इंटरनल स्टोरेज मिळू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here