चीनची कंपनी शाओमीचा सब ब्रँड रेडमीच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. रेडमी नोट ९ सीरीज आणि रेडमी ९ प्राईम सह चार स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी आहे. आजच्या या सेलमध्ये Redmi Note 9, Redmi Note 9 Pro, Redmi Note 9 Pro Max या फोन शिवाय नुकताच लाँच झालेला Redmi 9 Prime स्मार्टफोन समावेश आहे. या चार स्मार्टफोनमध्ये सर्वात स्वस्त रेडमी ९ प्राईम ची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. हा सेल ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉन इंडिया Amazon India आणि कंपनीची वेबसाईट Mi.com वर वेगवेगळ्या वेळात सुरू होणार आहे. शाओमीच्या रेडमी सीरीजला भारतात चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. रेडमीच्या आतापर्यंत झालेल्या फ्लॅश सेलला ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून फोन आउट ऑफ स्टॉक झालेला पाहायला मिळाला आहे. आजच्या रेडमीच्या सेलमध्ये कोणती ऑफर्स मिळणार आहे, पाहा…
या स्मार्टफोनला अॅमेझॉन इंडिया वर सकाळी १० वाजेपासून खरेदी सुरू आहे. आज या फोनचा पहिला सेल आहे. यानंतर १७ ऑगस्ट रोजी फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. फोनला 4GB + 64GB मॉडलची किंमत ९ हजार ९९९ रुपये आणि 4GB + 128GB मॉडलची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. या फोनध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो G80 प्रोसेसर आणि 5020mAh बॅटरी मिळते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 13MP + 8MP + 5MP + 2MP चा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.
रेडमी नोट ९ स्मार्टफोन आधी तीन कलर मध्ये येत होता. याचा नवीन कलर व्हेरियंट सुद्धा आता बाजारात आला आहे. या तीन कलरचा सेल अॅमेझॉनवर आज दुपारी २ वाजता सुरू झाला आहे. फोनचा 4GB + 64GB मॉडलची किंमत ११ हजार ९९९ रुपये तर 4GB + 128GB मॉडल ची किंमत १३ हजार ४९९ रुपये आहे. तसेच 6GB + 128GB मॉडलची किंमत १४ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले, मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसर आणि 5020mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 48MP + 8MP + 2MP + 2MP चा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
रेडमी नोट ९ प्रो चा सेल अॅमेझॉन आणि Mi.com दुपारी १२ वाजता सुरू झाला आहे. फोनच्या 4GB + 64GB मॉडलची किंमत १३ हजार ९९९ रुपये आणि 4GB + 128GB मॉडलची किंमत १५ हजार ४९९ रुपये तसेच 6GB + 128GB मॉडलची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आणि 5020mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 48MP + 8MP + 5MP + 2MP चा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
रेडमी नोट ९ प्रो मॅक्सचा सेल अॅमेझॉनवर आज सायंकाळी ४ वाजता सुरू होणार आहे. फोनच्या 6GB + 64GB मॉडल ची किंमत १६ हजार ९९९ रुपये , 6GB + 128GB मॉडल ची किंमत १८ हजार ४९९ रुपये, 8GB + 128GB मॉडलची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा पंच होल डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर आणि 5020mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 64MP + 8MP + 5MP + 2MP चा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I really like and appreciate your blog post.
Thank you ever so for you article post.
Like!! Really appreciate you sharing this blog post.Really thank you! Keep writing.