मुंबई : प्रसिद्ध मेसेंजर जवळपास प्रत्येकाची गरज बनलं आहे. व्हॉट्सअपने युझर्सच्या सोयीसाठी अनेक नवनवीन फीचर्सही आणले आहेत. पण यातलेच काही फीचर अडचणही ठरतात. तुम्ही चुकून एखाद्याला मेसेज पाठवला तर तो डिलीट करण्याची सोय आहे. पण हा एखादा महत्त्वाचा मेसेज जर चुकून डिलीट झाला तर तो परत मिळवायचा कसा हा मोठा प्रश्न असतो. मात्र व्हॉट्सअपमध्ये एक अशी ट्रिक आहे, ज्याच्या माध्यमातून डिलीट केलेला मेसेजही रिकव्हर केला जाऊ शकतो. मात्र यासाठी एक अट आहे. तुम्ही बॅकअप घेतल्यानंतरचा मेसेज असेल, तर तो रिकव्हर होणार नाही.

मेसेज रिकव्हर कसा कराल
?

अँड्रॉईड युझर्ससाठीच हा मार्ग उपलब्ध आहे. आयओएससाठी हा पर्याय नसेल. मोबाइलमध्ये फाइल मॅनेजर ओपन करा. व्हॉट्सअप फोल्डरमध्ये डेटाबेसवर क्लिक करा. या फोल्डरमध्ये व्हॉट्सअपच्या सर्व बॅकअप फाइल असतात. msgstore.db.crypt12 नावाच्या फाइलवर प्रेस करा आणि नाव एडिट करा.

नवीन नाव msgstore_backup.db.crypt12 असं द्या. ही फाइल नव्या फाइलने रिप्लेस होऊ नये यासाठी नवीन नाव आवश्यक आहे. आता सर्वात लेटेस्ट बॅकअप फाइलचं नाव msgstore.db.crypt12 असं ठेवा. यानंतर गुगल ड्राइव्हमध्ये जा आणि व्हॉट्सअप बॅकअप डिलीट करा. आता व्हॉट्सअप अनइंस्टॉल केल्यानंतर पुन्हा इंस्टॉल करा. पुन्हा व्हॉट्सअप चालू केल्यानंतर लोकल स्टोरेजमधून बॅकअपसाठी तुम्हाला विचारलं जाईल. इथे msgstore.db.crypt12 फाइल सिलेक्ट केल्यानंतर रिस्टोर टॅबवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा मेसेज मिळेल.

गुगल ड्राइव्ह किंवा आयक्लाऊड
या माध्यमातून आयफोन आणि अँड्रॉईडमध्येही मेसेज रिकव्हर करता येईल. व्हॉट्सअप अनइंस्टॉल करुन पुन्हा इंस्टॉल करा. पुन्हा व्हॉट्सअप चालू केल्यानंतर तुम्हाला गुगल ड्राइव्ह किंवा आयक्लाऊडमधून बॅकअप मागितलं जाईल. बॅकअप रिस्टोर करा. यानंतर संपूर्ण चॅटसह तुमचा मेसेज परत येईल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here