नवी दिल्लीः जून महिन्याच्या अखेरला भारत सरकारने ५९ चायनीज अॅप्सवर भारतात बंदी घातली होती. यात खूप प्रसिद्ध अॅप्सचा समावेश होता. त्यानंतर पुन्हा सरकारकडून ४७ चायनीज अॅप्सवर बंदी घालण्यत आली. यात अनेक लाइट व्हर्जनचा समावेश होता. या ४७ अॅप्समध्ये शाओमीच्या चा समावेश आहे.

वाचाः

भारत सरकारकडून शाओमीच्या कोणत्याही अॅपवर बंदी घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ५९ चायनीज अॅप्सच्या यादीत Mi कम्युनिटी अॅप आणि Mi Video अॅपचा समावेश होता. या दोन्ही अॅप्सला आता भारतात अॅक्सेस मिळणार नाही. आता Mi Brower अॅप्सचा यात समावेश करण्यात आला आहे. गुगल प्ले स्टोर शिवाय अॅपल अॅप स्टोरवरून याला हटवले आहे.

वाचाः

फोनमध्ये प्री इन्स्टॉल आहे अॅप
Mi Browser Pro App ला सध्या युजर्स वापर करीत आहेत. ज्यांच्या फोनमध्ये आधीच इन्स्टॉल आहे. आगामी काही काळात चायनीज अॅप्सप्रमाणे ब्लॉक करण्यात येईल. सर्व शाओमीच्या फोनमध्ये Mi Browser Pro App प्री इन्स्टॉल असते. यात पोको, रेडमी आणि मी फोनचा समावेश आहे. जर अॅपला ब्लॉक केल्यास युजर्संना फोनमध्ये हे असून सुद्धा त्याचा वापर करु शकणार नाहीत.

वाचाः

युजर्संना घाबरण्याची गरज नाही
शाओमीकडून सांगण्यात आले आहे की, भारतीय कायद्यानुसार, आम्ही नेहमीच डेटा प्रायव्हसी आणि सिक्योरिटी संबंधित आवश्यक गरजा पूर्ण केल्या आहेत. तसेच गाई़डलाईन्स फॉलो करीत आहोत. कंपनीने सांगितले की, कंपनी सरकारच्या निर्देशाचे पालन करणार आहे. तसेच सरकारशी संवाद साधून काय बदल करता येवू शकेल यासंबंधी चर्चा करणार आहे. त्यामुळे शाओमी फोन युजर्संना चिंता करण्याची गरज नाही.

वाचाः

या अॅप्सचा करा वापर
जर तुमच्याकडे शाओमी किंवा पोकोचा कोणताही फोन असेल तर गुगल क्रोम यासारखा मोबाइल ब्राउजर स्विच केला जावू शकते. Mi Browser च्या जागी यूजर्स क्रोम शिवाय Mozilla Firefox आणि Microsoft Edge वापर करु शकते.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here