मुंबई : तुम्हालाही ऑनलाइन पाहण्याची सवय असेल तर ही बातमी वाचल्यानंतर प्रायव्हसीबाबत भीती वाटेल. पाहण्याची सवय तुम्हाला अडचणीत आणू शकते. कारण, तुम्ही नाकळतपणे स्वतःलाच लक्ष्य करत आहात. हॅकर्सकडून सध्या ऑनलाइन पॉर्न पाहणाऱ्या युझर्सचं संगणक हॅक करुन त्यावर पाळत ठेवली जात आहे. या सर्व प्रकाराची रेकॉर्डिंग केली जाते आणि तुम्ही याबद्दल अनभिज्ञ राहता.

युझरची ऑनलाइन Activity पाहण्यासाठी हॅकर्सकडून पीसी किंवा लॅपटॉपमध्ये एका मालवेअरचा वापर केला जातो. मालवेअर इंस्टॉल झाल्यानंतर हॅकर्स वेबकॅमच्या माध्यमातून व्हिडीओ तयार करतात, ज्याद्वारे युझर्स पॉर्न पाहतात. यानंतर युझर्सला ब्लॅकमेल केलं जातं. पैसे न दिल्यास मेलमधील सर्व कॉन्टॅक्टला हा व्हिडीओ पाठवण्याची धमकी दिली जाते. सायबर गुन्हेगारी विश्वात याला सेक्सटॉर्शन (व्हिडीओ बनवून ब्लॅकमेलिंग) म्हटलं जातं.

हॅकर्सकडून युझर्सच्या इनबॉक्समध्ये सेक्सटॉर्शन मेल्सचा खच पडतो. युझरने वैतागून आपल्याला पैसे द्यावेत हा हॅकर्सचा प्रयत्न असतो. पैशांची मागणी ही बिटकॉईनमध्ये केली जाते. सर्वसाधारणपणे या मेलकडे दुर्लक्ष केलं जातं. पण हॅकर्सने यावरही उपाय शोधला आहे. रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओची खात्री होण्यासाठी हॅकर काही माहिती शेअर करतात.
आतापर्यंत या प्रकारचे ई-मेल्स इनबॉक्सच्या ऐवजी स्पॅम फोल्डरमध्ये जायचे. पण अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने हॅकर्सने ब्लॅकमेलिंगसाठी नवाच उपाय शोधला आहे.

ब्लीपिंग कम्प्युटरच्या एका रिपोर्टनुसार, सेक्सटॉर्शन आता विविध देशातील प्रादेशिक भाषांमध्येही केलं जात आहे. यासोबतच हॅकर्स बिटकॉईन्सची मागणी ही विविध दो भागात केली जाते. त्यामुळेच हे ई-मेल फिल्टर्समध्येही सापडले जात नाहीत. ई-मेलमध्ये केवळ ‘Google Translator’ हा एकमेव इंग्रजी शब्द आढळून येतो. दरम्यान, यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे, Apple, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांनी या प्रकारांपासून वाचण्यासाठी एक नवीन प्रणाली विकसित केली आहे. यामुळे लवकरच सेक्सटॉर्शनचे प्रकार रोखले जाऊ शकतील, अशी अपेक्षा आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here