नवी दिल्लीः नोकिया आणि फ्लिपकार्टने देशात नुकतेच ४३ इंच, ५५ इंच आणि ६५ इंच स्क्रीन साईजमध्ये स्मार्ट टीव्ही लाँच केले आहेत. एचएमडी ग्लोबलची मालकी असलेल्या नोकियाचे काही स्मार्ट टीव्ही भारतात आणू शकते. ३२ इंच आणि ५० इंच स्क्रीन साईजचे नोकिया स्मार्ट टीव्हीवर सध्या काम सुरू आहे. याला बीआयएस सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहे.

वाचाः

नोकिया पॉवर युजरच्या एका रिपोर्टच्या माहितीनुसार, ३२ इंच नोकिया स्मार्ट टीव्हीला 32TAHDN मॉडल नंबरने लिस्ट करण्यात आले आहे. लिस्टिंगवरून टीव्ही फुल एचडी रिझॉल्यूशन स्क्रीन असल्याची माहिती समोर आली आहे. फुल एचडी रिझॉल्यूशन स्क्रीन सोबत येणारा नोकियाचा हा पहिला टीव्ही असणार आहे. तर 50TAUHDN मॉडल नंबरने लिस्टेड करण्यात आलेल्या आणखी एका दुसऱ्या नोकिया टीव्हीत UHD रेजॉलूशन डिस्प्ले असू शकतो.

वाचाः

३२ इंचाच्या कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्ट टीव्ही असू शकतो. ४३ इंच स्क्रीनचा स्मार्ट टीव्हीची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. या हिशोबाप्रमाणे ३२ इंच टीव्हीची किंमत २१ हजार ९९९ रुपयांच्या जवळपास असू शकते. तर ५० इंचाच्या टीव्हीची किंमत ३६ हजार ९९९ रुपये असू शकते. नोकियाच्या या टीव्हीत JBL स्पीकर्स, इंटेलिजेंट डिमिंग, DTS ट्रूसराउंड आणि डॉल्बी ऑडियो यासारखे फीचर्स दिले जावू शकतात. हे टीव्ही गुगलच्या अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टमसोबत येईल. यात गुगल असिस्टेंट व्हाईस कमांड इंटरफेस मिळणार आहे.

वाचाः

नोकियाच्या या स्मार्ट टीव्हीत ‘Nokia PureCinema televisions’ फॅमिलीचा सहभाग असेल. या सर्व नोकिया स्मार्ट टीव्ही ‘Clear’ आणि ‘Pure’ ब्रँडिंग सोबत येतील.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here