Airtel, Jio, Vi, BSNL Plans : अलीकडे सर्वच क्षेत्रात मोबाईलचा वापर कमालीचा वाढला आहे. सर्वकाही आता डिजीटल होत असल्याने इंटरनेट ही फारच गरजेची गोष्ट झाली आहे. आता भारतात 5G इंटरनेटही लॉन्च झालं आहे. सध्या म्हटलं तर जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांनीच भारतात 5G ची सुविधा आणली आहे. पण दुसरीकडे वोडाफोन आयडिया, बीएसएनएल या कंपन्या देखील एकापेक्षा एक भारी रिचार्ज प्लॅन आणत स्वस्तात मस्त रिचार्ज प्लान ग्राहकांसाठी आणले आहेत. तर आता तुम्हीही तुमच्या स्मार्टफोनसाठी सर्वात स्वस्त अमर्यादित डेटा प्लानसह भारतातील सर्वोत्तम ​प्रीपेड योजना शोधत असाल तर? आम्ही Jio, Airtel, Vodafone Idea आणि BSNL मधील काही सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान्सबद्दल सांगणार आहोत…

एअरटेलचे सर्वात स्वस्त प्रीपेड आणि डेटा प्लान्स

एअरटेलचे सर्वात स्वस्त प्रीपेड आणि डेटा प्लान्स

एअरटेल स्वस्तात मस्त प्रीपेड प्लानसह रिचार्ज युजर्सना देण्यात अगदी आघाडीवर आहे. त्यांचा २८ दिवसांच्या वैधतेच्या कालावधीसह येणारा रिचार्द केवळ १४९ रुपयांना आहे. या पॅकेजमध्ये 2 GB डेटा, अमर्यादित कॉल, तसेच दरमहा 300 मोफत SMS समाविष्ट आहेत. तुम्ही 300 मोफत संदेश वापरल्यानंतर, स्थानिक एसएमएसची किंमत १ रुपये असेल. तसंच एकदा 2 GB डेटा मर्यादा गाठली की, तुम्हाला प्रति एमबी INR 0.50 बिल केले जाईल. या प्रीपेड प्लॅनमध्ये मोफत Hello Tunes, तसेच Wynk Music, Airtel Xstream आणि Amazon Prime सदस्यत्व देखील समाविष्ट आहे. तसंच Airtel चा सर्वात स्वस्त डेटा प्लानची किंमत ४८ रुपये आहे. यात २८ दिवसांच्या वैधतेच्या कालावधीसह 3 GB डेटाचा समावेश आहे. डेटा प्लॅनमधील डेटा संपल्यावर ग्राहकांना 50 पैसे असा रेट आकारला जाईल.

​वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

वोडाफोन-आयडियाचे स्वस्त प्रीपेड आणि डेटा प्लान्स

वोडाफोन-आयडियाचे स्वस्त प्रीपेड आणि डेटा प्लान्स

वोडाफोन-आयडियाचे भारतातील सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान हे १७९ रुपयांपासून सुरू होतात. ज्यामध्ये २८ दिवसांच्या कालावधीसह अमर्यादित टॉक टाइम, 2 GB डेटा आणि ३०० एसएमएस समाविष्ट आहेत. तुम्ही Vi मूव्हिज आणि टीव्ही शो देखील यामध्ये पाहू शकता. दुसरीकडे
​वोडाफोन-आयडियाचा स्वस्तातील डेटा पॅक म्हणाल तर तो १९ रुपयांपासून आहे. यामध्ये एकूण डेटाच्या 1 GB डेटा मिळत असून वैधता केवळ २४ तास इतकीच आहे. त्यानंतर ५९ रुपयांचा २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लान आहे.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

जिओचे सर्वात स्वस्त प्रीपेड आणि डेटा प्लान्स

जिओचे सर्वात स्वस्त प्रीपेड आणि डेटा प्लान्स

जिओच्या स्वस्त प्रीपेड प्लान्सचा विचार केला तर १९९ रुपयांपासून या रिचार्जची सुरुवात होते. या पॅकमध्ये २३ दिवसांच्या वैधतेसह 1.5 GB दरदिवसाला इंटरनेट मिळत असून जिओ टू जिओ फ्री कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसची सुविधाही आहे. स्वस्त जिओ डेटा प्लान म्हणाल तर Jio आपल्या वापरकर्त्यांना १५ रुपयांचा चे प्रीपेड पॅकेज देते. ज्यामध्ये एकूण डेटाचा 1 GB डेटा समाविष्ट असतो आणि तो ग्राहकांच्या सध्याच्या बेस प्लानशी जोडलेला असतो.

वाचा: घराचं होईल थिएटर! Home Theater घ्यायचा विचार करताय? १० हजारांच्या आत हे आहेत बेस्ट ऑप्शन

बीएसएनएलचे स्वस्त प्रीपेड आणि डेटा प्लान्स

बीएसएनएलचे स्वस्त प्रीपेड आणि डेटा प्लान्स

BSNL चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लानस १० रुपयांचा असून यामध्ये ७.४७ रुपयांचा टॉकटाईम मिळतो. या बीएसएनएल टॉप-अप असेही म्हणतात. तसंच डेटा प्लानचं म्हणाल तर १३ रुपयांमध्ये एक दिवसाच्या वैधतेसह २जीबी डेटा असणारा बीएसएनएलचा प्लान असून त्यानंतर ४८ रुपयांचा ५जीबी डेटासह ३० दिवसांच्या वैधतेचाही प्लान आहे.

​​वाचा : फेक कॉल आणि मेसेजपासून सुटका होणार, Aitel Jio आणि Vi चा AI बेस्ड नवा प्लान

जिओचा प्लान आहे बेस्ट

जिओचा प्लान आहे बेस्ट

आता इतके सगळे वेगवेगळे प्लान पाहिल्यावर नेमका कोणाचा प्लान बेस्ट हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर या सर्वांमध्ये बेस्ट व्हॅलिडिटी आणि चांगले फायदे जसंकी दमदार डेटा आणि सारंकाही असणारा प्लान रिलायन्स जिओचा आहे. रिलायन्स जिओ ही कंपनी आहे जी सर्वात कमी ८४ दिवसांचे पॅकेज ३६५ रुपयाना देते. हे पॅकेज तुम्हाला ६ जीबीपर्यंच डेटा वापरण्याची मुभा देते.

​वाचाः Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here