नवी दिल्लीः Nokia यावर्षी खूप वेगाने आपले स्मार्टफोन लाँच करीत आहे. या यादीत आता कंपनी आपल्या स्मार्टफोनची रेंज वाढवत ५.३ स्मार्टफोन लाँच करणार आहे. द मोबाइल इंडियनच्या वृत्तानुसार कंपनी ५.३ सोबत या महिन्यात आणखी दोन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. लाँच होणाऱ्या फोन्सचे नाव काय असणार आहे, याविषयी अद्याप अधिक माहिती उघड करण्यात आली नाही.

वाचाः

नुकतीच ब्लूटूथ SIG ने Nokia TA-1239, TA-1298, TA-1258 आणि TA-1292 ला सर्टिफाय केले आहे. TA-1258 मॉडल नंबर नोकिया C3 स्मार्टफोनचे आहे. याला कंपनीने नुकतेच चीनमध्ये लाँच केले आहे. nokiamob.net ने आपल्या एका वृत्तात म्हटले की, Nokia TA-1239, TA-1298 आणि TA-1292 नोकिया C3 आहे. त्यानंतर याचा अंदाज बांधाला जात आहे की, कंपनी लवकरच भारतात नोकिया सी३ सुद्धा लाँच करणार आहे.

वाचाः

नोकिया १.३ सुद्धा भारतात लवकरच एन्ट्री करण्यात येणार आहे. काही एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानूसार कंपनी नोकिया सी३ आणि १.३ ला लाँच करणार आहेकी, या सर्व अफवा आहेत. या विषयी अद्या्प काही सांगितले जावू शकत नाही.

वाचाः

नोकिया ५.३ चे वैशिष्ट्ये
६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी इंटरनल स्टोरेजसोबत येणाऱ्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनचा डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच डिझाईन सोबत येतो. स्नॅपड्रॅगन 665 SoC प्रोसेसर दिला आहे. फोन फ्री इन्स्टॉल्ड अँड्रॉयड १० ओएस सोबत येतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत ५ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनच्या रियर वर फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये 4000mAh बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here