नवी दिल्लीः ने आपला जबरदस्त ट्रान्सपॅरंट (आरपार पाहू शकणारा) स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. हा टीव्ही ५५ इंचाचा ट्रान्सपॅरंट OLED पॅनल आणि 120Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येतो. टीव्हीला सध्या चीनमध्ये लाँच केले आहे. भारतीय रुपयांप्रमाणे या टीव्हीची किंमत ५.३७ लाख रुपये आहे. या टीव्हीचा सेल १६ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.

वाचाः

Mi TV LUX OLED ची फीचर
५५ इंचाचा स्क्रीन साईज आणि 120Hz च्या डिस्प्लेच्या टीव्हीचा कॉन्ट्रास्टा रिशेयो 150000:1 आहे. हा टीव्ही DCI-P3 93% कलर स्पेक्ट्रम सोबत येतो. कंपनीच्या माहितीनुसार 0-बिट पॅनल 1.07 अब्ज कलर कॉम्बिनेशन दिसतो.

वाचाः

शाओमीच्या या नवीन टीव्हीत मीडियाटेक 9650 प्रोसेसर सोबत AI मास्टर स्मार्ट इंजिन देण्यात आले आहे. जबरदस्त साउंड साठी टीव्हीत AI मास्टर डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट सुद्धा दिला आहे. ओएस मध्ये टीव्ही खास कस्टमाइज्ड MIUI वर काम करते. टीव्हीचा युजर इंटरफेस खूप जबरदस्त आहे. यात होम पेज, सेटिंग्स, माय अॅपला आणखी चांगल्या प्रकारे डिझाईन करण्यात आले आहे. व्हिज्युअल्स फीचर आणि ट्रान्सपॅरेंट स्क्रीन ची क्वॉलिटीला जबरदस्त पद्धतीने पाहू शकता.

वाचाः

टीव्ही ऑलवेज – ऑन डिस्प्लेला सुद्धा सपोर्ट करते. त्यामुळे युजर डिस्प्ले आणि इमेज टेक्स्टला आपल्या पसंतीनुसार सेट करता येवू शकते. टीव्हीच्या ओव्हरऑल डिझाईनमध्ये राउंड बेस आणि ५.७ एमएमची अल्ट्रा थिन रेक्टाग्यूलर बॉडी सोबत येतो. शाओमीचा हा ट्रान्सपॅरंट एडिशन टीव्ही जगातील पहिला ट्रान्सपॅरंट आहे, असे कंपनीने म्हटले आहे. हा टीव्ही घर, गॅलरी, म्यूझियम, शॉपिंग मॉल आणि थियटर साठी बेस्ट आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here