गुगलने आपल्या भारतीय वापरकर्त्यांसाठी (यूजर्स) एक नवीन फीचर आणले आहे. पीपल कार्ड नावाचे हे नवे फीचर असून, गुगलने मंगळवारपासून याची सुरुवात केली. या फीचरमुळे आता यूजरना गुगल सर्चमध्ये आपले तयार करता येणार आहे. या पीपल कार्डमध्ये यूजरला आपली वेबसाइट, सोशल मीडियावरील माहिती आणि इतर माहिती देता येणार आहे. मात्र, यासाठी गुगल अकाऊंट असणे गरजेचे आहे.
वाचाः
‘या नवीन फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे, लाखो व्यक्ती, उद्योजक, नोकरी-स्वयंरोजगाराच्या शोधात असलेले लोक, स्वतंत्ररित्या काम करणाऱ्या व्यक्तींना याची मदत होणार आहे. भारतातील नागरिक आजपासून ‘पीपल कार्ड’ त्यांच्या मोबाइल फोनवरही शोधू शकतात, असे गुगल सर्चच्या व्यवस्थापक लॉरेन क्लार्क यांनी सांगितले. पीपल कार्डवरील माहितीचा दर्जा राखण्यासाठी गुगलने विविध प्रकारचे सुरक्षा आणि नियंत्रणांचे स्तर एकत्र केले आहेत. यामुळे फेक प्रोफाइल आणि चुकीच्या माहितीच्या प्रसाराला आळा बसेल, असा विश्वासही क्लार्क यांनी व्यक्त केला आहे. यामुळे अयोग्य यूजर्स आणि दर्जाहीन माहितीचा शोध घेणे शक्य हेणार आहे. पीपल कार्डच्या सुविधांचा गैरवापर टाळण्यासाठी एका अकाऊंटला एकच पीपल कार्ड तयार करता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वाचाः
असे बनवा पीपल कार्ड
गुगलवर यूजरला आपले पीपल कार्ड बनवण्यासाठी प्रथम गुगल अकाऊंटमध्ये साइन इन करावे लागेल. त्यानंतर यूजरला त्याचे नाव किंवा ‘अॅड मी टू सर्च’ असा सर्च द्यावा लागेल. त्यानंतर ‘अॅड युवरसेल्फ टू गुगल सर्च’ असा पर्याय यूजरला मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर गुगल संबंधित यूजरचा फोन नंबर मागेल. तो नंबर टाकल्यानंतर सहा अंकी ओटीपी नंबरने त्याची पडताळणी होईल. यानंतर गुगल यूजरला एक अर्ज देईल. यात यूजरला त्याचे पब्लिक प्रोफाइल बनवण्यासाठीची सर्व माहिती भरावी लागेल.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
These are actually great ideas in concerning blogging.
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
I like the valuable information you provide in your articles.
These are actually great ideas in concerning blogging.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.