वाचाः
Mi 10 Ultra चे फीचर्स
फोनमध्ये 2340×1080 पिक्सल रिझॉल्यूशन सोबत ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. यात 120Hz चा रिफ्रेश रेट आणि 240Hz चा टच सँपलिंग रेट मिळतो. हा फोन HDR 10+ सपोर्ट सोबत येतो. फोनच्या डिस्प्लेला ११२० निट्सचे ब्राईटनेस लेवर दिले आहे. १६ जीबी पर्यंत LPDDR 5 रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत UFS 3.1 स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 865 SoC प्रोसेसर दिला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात VC लिक्विड कूलिंह फीचर देण्यात आले आहे. फोन जास्त गरम होऊ नये यासाठी मल्टी-लेयर ग्रेफाइट, थर्मल सेंसर ऐरे आणि ग्रैफीनचा वापर केला आहे.
वाचाः
फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक २० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल शूटर, १२ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट सेन्सर आणि एक 120x अल्ट्रा झूम सपोर्ट करणारा टेलिफोटो शूटर दिला आहे. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये देण्यात आलेला प्रायमरी आणि टेलिफोटो लेन्सने 8K व्हिडिओ रेकॉर्ड आणि शूट केला जावू शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh बॅटरी दिली आहे. फोन 120 वॉट ची फास्ट चार्जिंग सोबत येतो. याच्या मदतीने फोन फुल चार्ज केवळ २३ मिनिटात होतो, असे कंपनीने सांगितले.
वाचाः
फोनची किंमत
कंपनीने हा फोन सध्या केवळ चीनमध्ये लाँच केला आहे. १६ जीबी पर्यंतच्या रॅम आणि ५१२ जीबी पर्यंतच्या स्टोरेजच्या फोनची किंमत ५२९९ चीनी युआन म्हणजेच ५७ हजार रुपये आहे. चीनमध्ये या फोनचा सेल १६ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. या फोनला चीनच्या बाहेर कधीपर्यंत लाँच करण्यात येणार आहे, याविषयी शाओमी कंपनीने अद्याप काही माहिती दिली नाही.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Thanks for fantastic info I was looking for this info for my mission.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.