Gift Smartphone on Mothers Day 2023 : रविवारी म्हणजेच १४ मे रोजी यंदा मातृदिन अर्थात मदर्स डे साजरा केला जाणार आहे. आता अनेकजण यंदा आईला काय गिफ्ट द्यायचा विचार करत असतील. तर आता जर तुम्हाला असं एखादं गिफ्ट द्यायचंय जे भारी वाटेल, कामासाठी आणि मनोरंजन अशा दोन्हीसाठी उपयोगी असेल , असं गिफ्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर हे गिफ्ट म्हणजे एक छान असा स्मार्टफोन.
सध्या मार्केटमध्ये एकापेक्षा एक स्मार्टफोन कंपन्या असून प्रत्येकजण अगदी १० हजारांपेक्षा कमी किंमतीचा स्मार्टफोनही बाजारात लाँच करत आहे. सॅमसंग, रेडमी, रिअलमी, पोको अशा टॉप ब्रँडचे फोन १० हजारांपेक्षा कमी मिळत असून असाच एखादा छान फोन तुम्ही मदर्स डे निमित्त तुमच्या आईला गिफ्ट करु शकता… तर नेमका कोणता फोन तुम्हाला गिफ्ट करायचा आहे हे जाणून घेण्यापूर्वी पाहूया, नेमके कोणते मॉडेल्स , उपलब्ध आहेत..

PCOC C55 (किंमत ८,४९९ रुपये)

pcoc-c55-

या यादीतील पहिला फोन हा पोको कंपनीचा POCO C55 असून याची किंमत ९,४९९ रुपये आहे, १० हजार रुपयांच्या खाली येणाऱ्या स्मार्टफोन्समधील हा एक बेस्ट ऑप्शन आहे. यात MediaTek Helio G85 SoC प्रोसेसरसह 4GB आणि 6GB रॅमचे दोन पर्याय आहेत. तसंच 64GB आणि 128GB असे दोन स्टोरेज ऑप्शन्सही आहेत. तसंच 50MP चा प्राथमिक कॅमेराअसून HD+ रिझोल्यूशनसह 6.71-इंच डिस्प्ले आणि 5,000mAh ची बॅटरी आहे.

​वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

​Realme Narzo 30A (किंमत ८, ९९९ रुपये)​

realme-narzo-30a-

Realme Narzo 30A हा मॉडेल Narzo 20A चा अपग्रडेड व्हर्जन असून एक कमी किंमतीत भारी फोन आहे. हा बऱ्याचदा आउट ऑफ स्टॉकही असून या स्मार्टफोनमधील फीचर्सही भारी आहेत. फोनमध्ये MediaTek Helio G85
प्रोसेसर असून 3 GB रॅम आणि दिला गेला आहे. तसंच डिस्प्ले ६.५ इंचेसचा असून 60 Hz रिफ्रेश रेट आहे. कॅमेरा म्हणाल तर मागे 13 MP + 2 MP असं ड्युअल कॅमेरा सेटअप असून फ्रंटला 8 MP कॅमेरा आहे. याची बॅटरी अगदी दमदार अशी तब्बल 6000 mAh इतकी आहे.

वाचाः फास्ट चार्जिंग फीचर तुमच्या स्मार्टफोनसाठी किती फायद्याचं किती तोट्याचं?

​Samsung Galaxy F12 (किंमत १०,४९९)

samsung-galaxy-f12-

या यादीत सँमसंगचे फोनही असून यातील एक म्हणजे Samsung Galaxy F12. हा फोन १० हजार ४९९ रुपयांना असून यात दमदार बॅटरी लाइफ, हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले, उत्तम प्रोसेसर, भारी कॅमेरा असे फीचर्स आहेत. फोनमध्ये Samsung Exynos 8 Octa 850 प्रोसेसर 4 GB रॅमस आहे. ६.५ इंचाचा डिस्प्ले 90 Hz रिफ्रेश रेटसह आहे. तसंच
48 + 5 + 2 + 2 MP असा चार कॅमेऱ्यांचा सेटअप रेअर पॅनलला असून 8 MP फ्रंट कॅमेरा असून 6000 mAh ची दमदार बॅटरी आहे.

​वाचाःPhone Hacked: ‘या’ पाच गोष्टी होत असतील तर समजा हॅक झालाय तुमचा फोन, होऊ शकतो मोठा तोटा

Xiaomi Redmi 12C (किंमत ८,९९९ रुपये)

xiaomi-redmi-12c-

बजेट फोन बनवण्यात आघाडीवर असणाऱ्या रेडमीचे फोन या यादीत असून यातील एक म्हणजे ​Xiaomi Redmi 12C याची किंमत ८,९९९ रुपये आहे. फीचर्सचं म्हणाल तर, प्रोसेसर MediaTek Helio G85 हा 4 GB रॅमसह आहे. डिस्प्ले ६.७१ इंचाचा IPS LCD असून 60 Hz रिफ्रेश रेट आहे. कॅमेरा 50 MP + 0.08 MP असा ड्युअल सेटअप असून 5 MP फ्रंट कॅमेरा आहे. तसंच बॅटरी 5000 mAh इतकी आहे.

वाचा : तुमच्या Android फोनमध्ये या ५ सेटिंग्स सुरु ठेवणं पडेल महाग, ऑन असतील तर आताच करा ऑफ

Samsung Galaxy F13 (किंमत ९, ६९९ रुपये)

samsung-galaxy-f13-

सँमसंग कंपनीचा ​आणखी एक फोन या यादीत असून हा फोन म्हणजे Samsung Galaxy F13 ज्याची किंमत ९, ६९९ रुपये आहे. फोनच्या फीचर्सचं म्हणाल तर यात
Samsung Exynos 8 Octa 850 प्रोसेसर हा 4 GB रॅमसह आहे. डिस्प्ले ६.६ इंचाचा असून 60 Hz रिफ्रेश रेट आहे. कॅमेरा म्हणाल तर 50 MP + 5 MP + 2 MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला 8 MP कॅमेरा आहे. बॅटरी 6000 mAh इतकी आहे.

​वाचा : मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक

​Tecno Spark 7T (किंमत ८,९९९ रुपये)

tecno-spark-7t-

Tecno Spark 7T हा देखील एक बजेट फोन असून या किंमतीच्या रेंजमध्ये एका आकर्षक डिझाइनसह येतो. फोनच्या फीचर्सबद्दल म्हणाल तर यामध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर असून 4 GB रॅम आहे. डिस्प्ले ६.५२ इंचाचा असून तब्बल 48 MP चा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय 8 MP चा फ्रंट कॅमेरा असून 6000 mAh ची बॅटरी दिली गेली आहे.

वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!

Realme C15 (किंमत ९,४४९ रुपये)

realme-c15-

आणखी एक कमी बजेटमध्ये भारी फोन म्हणजे Realme C15. तब्बल 6,000mAh बॅटरी आणि क्वाड कॅमेरा सेटअपसह येणारा हा फोन ९,४४९ रुपयांना येत आहे. यामध्ये
MediaTek Helio G35 हा प्रोसेसर असून 3 GB इतका रॅम आहे. कॅमेरे म्हणाल तर ​13 + 8 + 2 + 2 MP असे असून 8 MP चा फ्रंट कॅमेराही आहे. 6.52 इंचाचा डिस्प्ले 60 Hz रिफ्रेश रेटसह असून इतरही भन्नाट फीचर्स आहेत.

​वाचाः Solar Storm : सूर्यावरील मोठ्या धमाक्यानंतर पृथ्वीवरही पोहोचलं वादळ, लदाखमध्ये दिसला परिणाम

Xiaomi Redmi 10 (किंमत ९,५९६ रुपये)

xiaomi-redmi-10-

शाओमी कंपनीचा रेडमी १० हा फोन ९,५९६ रुपये किंमतीसह या यादीत आहे. याचे फीचर्स म्हणाल तर Snapdragon 680 हा एक दमदार प्रोसेसर यात आहे. तसंच 4 GB रॅम असून ६.७ इंचाचा डिस्प्ले आहे. 60 Hz रिफ्रेश रेट असून कॅमेराही भारी असा 50 MP + 2 MP इतका आहे. फ्रंटला 5 MP कॅमेरा असून 6000 mAh ची बॅटरी दिली गेली आहे.

वाचाः ChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान

Infinix Hot 10S (किंमत ९,९९९ रुपये)

infinix-hot-10s-

Infinix कंपनीचा Infinix Hot 10S या यादीत असून याची किंमत ९,९९९ रुपये आहे. हा फोन एक सक्षम प्रोसेसर, एक स्मूद 90Hz डिस्प्ले आणि 48MP प्रायमरी कॅमेऱ्यासह येतो. तसंच या फोनमध्ये 6,000mAh ची दमदार बॅटरी देखील आहे. इतर फीचर्सचं म्हणाल तर MediaTek Helio G85 प्रोसेसर 4 GB रॅमसह दिला आहे. तसंच ६.८२ इंचाचा डिस्प्ले 90 Hz रिफ्रेश रेटसह दिला आहे. 48 MP + 2 MP ड्युअल कॅमेरा फोनमध्ये असून फ्रंटला 8 MP कॅमेरा आहे.

वाचा : यंदाच्या Mother’s Day 2023 निमित्त आईला करुन द्या वर्षभरासाठीचा रिचार्ज, कोणती कंपनी देतेय बेस्ट डिल?

Realme C55 (किंमत १०,९९९ रुपये)

realme-c55-

रिअलमीचा आणखी एक दमदार फीचर्स असणारा फोन या यादीत असून याची किंमत थोडी अधिक म्हणजेच १०,९९९ रुपये आहे. पण बँक ऑफर्स किंवा इतर डिस्काउंटसह हा फोन १०००० किंवा त्याहून कमी किंमतीत नक्कीच येऊ शकतो. आता याचे फीचर्स म्हणाल तर फोनमध्ये 6.72-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह आहे. तसंच फोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसरसह 8 GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 128 GB पर्यंत स्टोरेज देण्यात आलं आहे. Realme C55 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह दुय्यम कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून 5,000mAh बॅटरी आहे.

​वाचा : WhatsApp Tricks: आता वीजेचं बिल भरणं झालं सोपं, व्हॉट्सॲपद्वारेही भरु शकता बिल, या स्टेप्स करा फॉलो

Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here