नवी दिल्लीः मायक्रोसॉफ्ट कडून अखेर दोन स्क्रीनचा Microsoft Surface Duo लाँच करण्यात येणार आहे. या फोनवरून १० सप्टेंबर रोजी पडदा हटवला जाणार आहे. कंपनीने या फोनचा टीझर आधीच लाँच केला आहे फायनल घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. पुढच्या महिन्यात या फोनला लाँच करण्यात येणार आहे.

वाचाः

यूएस मध्ये ग्राहकांना आतापासून मायक्रोसॉफ्टच्या ऑनलाइन स्टोर आणि बाकी प्लॅटफॉर्म्सवर प्री ऑर्डर करता येवू शकते. मायक्रोसॉफ्ट कडून Surface Duo ची डिझाईन गेल्या वर्षी ऑक्टोबर २०१९ मध्ये शेयर करण्यात आली होती. आता याला एक वर्ष पूर्ण होत आहे.

वाचाः

किंमत किती असणार
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, यात दोन वेगवेगळे ५.६ इंचाचे ओलेड डिस्प्ले दिले आहेत. यात पॅनल असणार आहेत. ज्याचे रिझॉल्यूशन 1800×1350 पिक्सल्स आणि आस्पेक्ट रेशियो 4:3 असणार आहे. हा फोन उघडल्यानंतर याचा पूर्ण डिस्प्ले इंटरफेस ८.१ इंचाचा होईल. ड्यूल स्क्रीन अँड्रॉयड टेबलेट स्मार्टफोनची किंमत १३९९ यूएस डॉलर म्हणजेच १ लाख ४ हजार ६०० रुपये आहे.

केवळ एकच कॅमेरा
दोन वेगवेगळे स्क्रीन असल्याने यात कोणताही फोल्डिंग एलिमेंट नसणार आहे. यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. दोन्ही स्क्रीनवर गोरिला ग्लास प्रोटेक्शन दिले आहे. यात ११ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाणार आहे. जो 7x झूम सपोर्ट देईल. तसेच याशिवाय EIS सोबत 4K व्हिडिओ रेकॉर्ड करु शकता येईल. या कॅमेऱ्याला फ्रंट आणि रियर कॅमेऱ्याचा वापर केला जावू शकतो.

वाचाः

5G सपोर्ट नाही
यात इतर वैशिष्ट्यांप्रमाणे क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर, 6 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज मिळू शकतो. यात एलटीईचा सपोर्ट मिळणार आहे. परंतु, ५ जी कनेक्टिविटी मिळणार नाही. यात दोन वेगवेगळी बॅटरी पॉवर मिळणार आहे. यात दोन्ही बॅटरीची कॅपिसिटी 3,577mAh मिळू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here